Tuesday, July 3, 2018

फज़ा भी है जवाँ जवाँ,

 वातावरण पाऊसमय झालं आहे. आसमंतात सावळा प्रकाश दाटला आहे, हवा कुंद झाली आहे. कुठे रिमझिम, तर कुठे मुसळधार पाऊस कोसळत आहे. आणि "पाऊस" म्हंटलं की आठवणी आल्याच, हुरहुर आलीच ! हो ना ? मग आपल्यालाही "हसन कमाल" यांनी शब्दबद्ध केलेल्या व "सलमा आगा" यांनी त्यांच्या अजरामर आवाजात गायीलेल्या, अशाच एका आठवणी जाग्या करणार्‍या आणि हुरहुर लावणार्‍या एका गीताचा अनुवाद या आठवड्यात करायचा आहे. गीत आहे "फज़ा भी है जवाँ जवाँ".

फज़ा भी है जवाँ जवाँ, हवा भी है रवाँ रवाँ
सुना रहा है ये समा, सुनी सुनी सी दास्ताँ ॥धृ॥

पुकारते हैं दूर से, वो काफ़िले बहार के
बिखर गए हैं रंग से किसी के इंतज़ार के
लहर-लहर के होँठ पर वफ़ा की हैं कहानीयाँ ॥१॥

बुझी मगर बुझी नहीं, न जाने कैसी प्यास है ?
करार दिल से आज भी, न दूर है न पास है
ये खेल धूप-छाँव का, ये कुरबतें, ये दुरीयाँ ॥२॥

हर एक पल को ढूँढता, हर एक पल चला गया
हर एक पल फ़िराक़ का, हर एक पल विसाल का
हरेक पल गुज़र गया बना के दिल पे इक निशाँ ॥३॥

काही कठीण शब्दांचे अर्थ-

१. फज़ा = वातावरण
२. रवाँ रवाँ = आर्द्र हवा
३. कुरबतें = सहवास
४. फ़िराक़ = विरह, दुरावा
५. विसाल = भेटी, सहवास.

----------------------------------
तरुणाईचा उत्साह,
वातावरणात नवा
हवेत मंद गारवा

ऎकु येती अशावेळी
श्रांतलेल्या आठ्वणी
एकांतात सुन्यावेळी..........

आवाज देती लांबुनी,
यौवनाचे प्रवास यात्री
ऊधळले रंग रंग,
कुणासाठी वाटेवरी
तरंगाच्या ओठांवरी
.प्रेमाच्या कथालहरी.............

शांतली परी अशांत,
अशी कशी भासे तॄष्णा
मनातली अशांतता,
नसे जवळी ना दुरी
जवळीक न दुरावा,
खेळ उनसावलीचा..........

हरेक क्षणी शोधता
हरेक क्षण जातसे
हरेक क्षणी विरह,
हरेक क्षण भेटिचा
हरेक क्षण चालला ,
ह्र्दयी करुनि निशाण..........

 

तरूण आसमन्त हा....

तरूण आसमन्त हा, हवेत कुन्द गारवा
सांगतो ऋतु पुन्हा,ज्ञात तीच ती कथा !

लवाजमे बहारीचे खुणावती दुरोनी ते
उधळले चहूकडे प्र्तीक्ष-रंग कोणते ?
लाट लाट गातसे एकनिष्ठ भाव ते !

कशी तहान ही अशी, पिऊनही न भागली ?
हृदी अजून शान्तता दूर-जवळ भासली !
ऊन सावली पहा समीप-दूर खेळते !

एकमेक शोधती क्षण निघून चालले
क्षण कधी दुरावले, क्षण नजीक पावले !
ठेवुनी निशाण हृदयी क्षण तसेच संपले !

मूळ गीत: फज़ा भी है जवाँ जवाँ, हवा भी है रवाँ रवाँ
(चित्रपट: निकाह (१९८२)
गीतकार: हसन कमाल
गायिका: सलमा आग़ा )

From my collection..Author unknown🙏🏻

No comments:

Post a Comment