Friday, February 23, 2018

हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे..!! ग्रेस

हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे..!!

, “ही कविता मला खूप आवडते, पण कळत नाही!” असं फक्त ग्रेसच्या कवितेच्या बाबतीतच म्हंटलं जाऊ शकतं. “कळली नाही मग आवडली कशी?” हा प्रश्नच उद्भवत नाही. याला कारण ग्रेसची विलक्षण अद्भुत प्रतिमासृष्टी. (याच कारणाने जीए आवडतात.)

‘भय इथले संपत नाही’ ही कविता तशीच आहे. अनेकांना ‘आवडते’ पण ‘कळत’ नाही. त्यात शब्दांची चमत्कृती नाही पण उपमांची भरपूर आहे. मला ती जशी ‘कळली’ आहे, तशी मी लिहिते. कुठलीही चांगली कविता ही प्रत्येक वाचकासमोर वेगळे विभ्रम घेऊन येत असते. प्रत्येकजण त्यातून वेगळे अर्थ काढत असतो. तो कवीच्या अर्थाशी जुळेल किंवा जुळावा असा काहीही नियम चांगल्या कवितेला लावता येत नाही. त्यात वाचकाची बुद्धी, त्याची आकलनशक्ती, त्याची संवेदनशीलता आणि त्याची त्या-त्या वेळची मनोवस्था, याचा खूप मोठा सहभाग असतो. मला लागलेला अर्थ जेव्हा मी ग्रेसना सांगितला होता तेव्हा ते फक्त हसले होते. पण त्यानंतर एका विद्वानांच्या बैठकीत त्यांनी मला तो अर्थ सांगण्याचा आग्रह केला होता.

भय इथले संपत नाही…मज तुझी आठवण येते…
मी संध्याकाळी गातो…तू मला शिकविली गीते…

“भय इथले संपत नाही” हे काही भित्र्या मनाचे कन्फेशन नाहीये. ते वैचारिक स्थित्यन्तराचे वळण आहे.. त्यातली संध्याकाळ हा आयुष्याचा संधिकाल आहे. तारुण्य पूर्ण गेलेलं नाही, वार्धक्यात काय वाढून ठेवलेले असेल हे नीटसं माहीत नाही, असा जीवाला रुखरुख लावणारा संधिकाल. देवाची याद यायला लागलेली असते, पण जवानीत केलेल्या मस्तीची सय मनामागे गेलेली नसते.. काही चुकांच्या सावल्या भेडसावत असतात.. अशी ही आयुष्याची संध्याकाळ..!! कातरवेळ..!!

या कवितेची सुरुवातच अनपेक्षित होते, हे आणखी एक सौंदर्यस्थळ.. एक, दोन, तीन, चार करत दहापर्यंत जात नाही ही कविता.. पाच, सहा, सात…. मग एक, दोन, तीन, चार आणि मग सफाईदारपणे आठ, नऊ, दहा असा प्रवास आहे तिचा… पुढच्या पंक्ती-

हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया
यातले ‘झरे’ हे लैंगिकतेचं प्रतिक आहे.. पृथ्वीचे भगवे सन्यस्तपण ही ‘माया’ म्हणजे खोटी वाटावी, असं वय.. आपल्यातून पुन्हा-पुन्हा काहीतरी, कोणीतरी ‘उगवत’ राहावे या ओढाळ असोशीपायी सततचा लैंगिक संग… उफ्फ….
झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया…
(माणसाला तंत्र-विद्येत ‘झाड’ म्हणतात. ग्रेसना अशा गूढ गोष्टींचे आकर्षण होते. त्यांच्या-माझ्या मैत्रीचा समान दुवा होता तो. या गूढाच्या आकर्षणापाई त्यांच्या प्रतिमा खूपदा गूढ असत. तंत्रविद्येत सामान्य माणसाला शून्य किंमत असते. तो तांत्रिकाच्या हातातले बाहुले असतो, झाड असतो. संसारात असतांना आपली किंमत ही शून्य असते. आपण ‘त्या वरच्या तांत्रिका’च्या हातातले बाहुले असतो. झाड असतो.. आणि ही झाडं एकमेकांना भिडत असतात, जुगत असतात.. “झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया…!!” माणसाला असणाऱ्या ‘वंशसातत्या’च्या ओढीवर केलेला प्रहार आहे हा..!!)

त्या वेली नाजुक भोळ्या, वाऱ्याला हसवून पळती
क्षितिजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातिल जणू अंगी राघव शेला

या चारी ओळी म्हणजे तारुण्यातल्या आनंदाचा, शृंगाराचा काळ.. आणि त्या शृंगाराला आलेलं फूल.. आपलं अपत्य..!! त्याचे ते बोबडे बोल माणसाच्या पूर्ण आयुष्याचा ताबा घेतात. सीतेला हाकलून दिल्यानंतर तिच्याजवळ रामाचा एक शेला होता. त्याचा स्पर्श तिला आनंद द्यायचा, समाधान द्यायचा. पण ते खोटं होतं. अखेर तिला धरणीच्या पोटातच आधार घ्यावा लागला. आपली मुलं त्या शेल्यासारखी असतात/असू शकतात. अंत एकाकीच असतो.

देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ, फुटला खांब
थरथरत्या बुबुळापाशी, मी उरला सुरला थेंब
संध्येतील कमल फुलासम, मी नटलो शृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने

हाकेच्या अंतरावर देऊळ होतं.. पण मी, संध्येतील कमल फुलासम, नटलो शृंगाराने.. सगळे चोचले देहाचे.. दैहिक इच्छांचे रान माजलेले.. आणि मी याचक.. प्रेम द्या, सुख द्या.. माझ्या भुका भागातच नव्हत्या.. माझी प्यास शमतच नव्हती… आणि अशातच एक दिवस, मी पसरलेल्या माझ्या ओंजळीतच तो खांब फुटला… ज्या खांबातून नरसिंहाने उग्र दर्शन देऊन विलासात लिप्त असलेल्या माझ्या राक्षसरूपी मनाचे निर्दालन केले. (हे नरसिंह-हिरण्यकश्यपू कथेचे रूपक आहे.)
आणि मग…

स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

आता मी इतका रूपांतरित झालोय की माझ्या इंद्रियांना आता तुझ्या स्तोत्राशिवाय काही सुचत नाही. त्यांना पूर्वीची ओढ आजही लागते. पण ते कुणातरी परक्याचे दु:ख आहे असंच वाटतं मला.. कारण.. आता माझ्या स्मरणात फक्त तू आहेस.. हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

ते धुके अवेळी होते, की परतायाची घाई
मेंदूतुन ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई

‘लागा चुनरी में दाग’ हे कळलं आणि ‘छुपाऊं कैसे’ हा घोर लागला..!! डोळ्यावर आलेले ते धुके म्हणजे डोळ्याचा भ्रम होता हे लक्षात आल्यावर देवा, आता मला तुझ्याकडे परतायची घाई झाली आहे.. सगळ्या इच्छा पूर्ण होऊन गळून पडल्या आहेत, (आता मला बोलावून घे तुझ्याकडे… कारण आता हे जग मला भीतीदायक वाटतं, ते मला तुझ्यापासून दूर नेतं..) भय इथले संपत नाही.. मज तुझी आठवण येते.. मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवली गीते..

देवत्वाची प्रचिती आल्यावर प्रामाणिकपणे केलेली ही आर्त आळवणी आहे, प्रार्थना आहे..!!

Maithili Subhash

Saturday, January 27, 2018

All the world’s a stage” . BY WILLIAM SHAKESPEARE

“All the world’s a stage”
.

BY WILLIAM SHAKESPEARE
.
(from As You Like It, spoken by Jaques)
.
.
.

                                        All the world’s a stage,
And all the men and women merely players;
They have their exits and their entrances;
And one man in his time plays many parts,
His acts being seven ages.
.
.
At first the infant,
Mewling and puking in the nurse’s arms;

And then the whining school-boy, with his satchel
And shining morning face, creeping like snail
Unwillingly to school.

And then the lover,
Sighing like furnace, with a woeful ballad
Made to his mistress’ eyebrow.

Then a soldier,
Full of strange oaths, and bearded like the pard,
Jealous in honour, sudden and quick in quarrel,
Seeking the bubble reputation
Even in the cannon’s mouth.

And then the justice,
In fair round belly with good capon lin’d,
With eyes severe and beard of formal cut,
Full of wise saws and modern instances;
And so he plays his part.

The sixth age shifts
Into the lean and slipper’d pantaloon,
With spectacles on nose and pouch on side;
His youthful hose, well sav’d, a world too wide
For his shrunk shank; and his big manly voice,
Turning again toward childish treble, pipes
And whistles in his sound.

Last scene of all,
That ends this strange eventful history,
Is second childishness and mere oblivion;
Sans teeth, sans eyes, sans taste, sans everything.

Tuesday, January 2, 2018

सरस्वती वन्दना


 

या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना।

या ब्रह्माच्युत शंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥1॥

जो विद्या की देवी भगवती सरस्वती कुन्द के फूल, चंद्रमा, हिमराशि औरमोती के हार की तरह धवल वर्ण की है और जो श्वेत वस्त्र धारण करतीहै, जिनके हाथ में वीणा-दण्ड शोभायमान है, जिन्होंने श्वेत कमलों परआसन ग्रहण किया है तथा ब्रह्मा विष्णु एवं शंकर आदि देवताओं द्वाराजो सदा पूजित हैं, वही संपूर्ण जड़ता और अज्ञान को दूर कर देने वालीसरस्वती हमारी रक्षा करें ॥1॥

Monday, January 1, 2018

दमा दम मस्त कलन्दर


हो लाल मेरी पट रखियो बल झूले लालन
लाल मेरी पट रखियो बल झूले लालन
सिन्ध्ड़ी दा सेहवन दा सखी शाबाज़ कलंदर
दमा दम मस्त कलंदर, अली दा पहला नंबर
दमा दम मस्त कलंदर, सखी शाबाज़ कलंदर
हो लाल मेरी..हो लाल मेरी..
हो चार चराग तेरे बलां हमेशा
हो चार चराग तेरे बलां हमेशा
चार चराग तेरे बलां हमेशा
पंजवा में बलां आई आन बला झूले लालन
हो पंजवान में बालन
हो पंजवान में बालन आई आन बलां झूले लालन
सिन्ध्ड़ी दा सेहवन दा सखी शाबाज़ कलंदर
दमा दम मस्त कलंदर, अली दा पहला नंबर
दमा दम मस्त कलंदर, सखी शाबाज़ कलंदर
हो लाल मेरी..हाय लाल मेरी..
हो झनन झनन तेरी नोबत बाजे
हो झनन झनन तेरी नोबत बाजे
झनन झनन तेरी नोबत बाजे
नाल बाजे घड्याल बलां झूले लालन
हो नाल बाजे..
नाल बजे घड़ियाल बला झूले लालन
सिन्ध्ड़ी दा सेहवन दा सखी शाबाज़ कलंदर
दमा दम मस्त कलंदर, अली दा पहला नंबर
दमा दम मस्त कलंदर, सखी शाबाज़ कलंदर
कलंदर..
(हो लाल मेरी, हाय लाल मेरी..)
अली दम दम दम अली अली

“O the red robed, May I always have your benign protection, Jhulelal, O the lord, the friend and the Sire of Sindh and Sehwan (or Serwan ),The red robed God-intoxicated Qalandar, you who have mastered life, glory unto to you.”
O red robed one! May I always be protected by You, O Jhoolelaaln

Your shrine is always lighted with four lamps, And here I come to light a fifth lamp in your honor.”

“Your heroic name ring out across (Naubat khanas) in Hind & Sindh (or lets the gongs bell loud ), Let the gong ring loud for your glory day and night by the people.”

“O Lord, may you prevail every time, everywhere, I pray of your well being, In the name of Ali, I pray to you to help my boat cross the river of life in safety”

लाल रंगाचा अंगरखा घातलेल्या झुलेलाला माझ्या पाठीशी राहा
सिंध आणि सेह्वानच्या विरागी आणि कलंदरा (माझ्या पाठीशी राहा  );

चार दिवे तुझ्या आसनाभोवती कायम लावलेले असतात
पाचवा लावायला मी येते आहे

तुझ्या नावाचे चौघडे कायम वाजतच असतात
ते रात्रंदिवस मोठ्याने वाजतच राहुदेत

Monday, April 3, 2017

आप की आखो मे कुछ महके हुए


किशोर: आप की आँखों में कुछ महके हुए से राज़ है
आपसे भी खूबसूरत आपके अंदाज़ हैं
आप की आँखों में कुछ महके हुए से राज़ है

लब हिले तो मोगरे के फूल खिलते हैं कहीं     \- २
आप की आँखों में क्या साहिल भी मिलते हैं कहीं
आप की खामोशियाँ भी आप की आवाज़ हैं

लता: आप की आँखों में कुछ महके हुए से राज़ है
आप से भी खूबसूरत आपके अंदाज़ हैं
आप की आँखों में कुछ महके हुए से राज़ है

आप की बातों में फिर कोई शरारत तो नहीं     \- २
बेवजह तारिफ़ करना आप की आदत तो नहीं
आप की बदमाशियों के ये नये अंदाज़ हैं
किशोर: आप की आँखों में कुछ महके हुए से राज़ है
लता: आप से भी खूबसूरत आपके अंदाज़ हैं
आप की आँखों में कुछ महके हुए से राज़ है
Movie/Album: घर (1978)Music By: आर.डी.बर्मनLyrics By: गुलज़ारPerformed By: किशोर कुमार, लता मंगेशकर
There are some fragranting secrets in your eyes
Even more beautiful than you is your style
When your lips move, it’s like jasmine has blossomed
Do shores meet somewhere in your eyes?

Even your silence speaks your voiceIs there again any mischief in your talks?
Is it your habit to praise without any reason?
These are new styles of your mischief



Tuesday, March 21, 2017

सजण दारी उभा--सलील कुलकर्णी

सजण दारी उभा…

मला तब्बल दहा वर्षांनंतर नव्याने उलगडलेली ही कविता… अजून दहा वर्षानंतर कदाचित अजून उलगडेल… तोपर्यंत ती आळवत राहायला हवं… कारण कलाकृती तशीच राहते, पण आपण वेगळे असतो… दर काही वर्षांनी!
अद्यापही सुऱ्याला माझा सराव नाही अद्यापही पुरेसा हा खोल घाव नाही’ कवितेमध्ये ही मस्ती… लिखाणातली ही कलंदर वृत्ती मराठी काव्यरचनांमध्ये क्वचित आढळते. मराठीत गज़लच्या अचूक वृत्ताबरोबरच गज़लची नेमकी वृत्ती ज्यांना समजली, त्या नावांमधलं महत्त्वाचं नाव म्हणजे कविवर्य सुरेश भट.
‘ओठी तुझ्या ना आले अद्याप नाव माझे
अन् ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही’
अहाहा काय अंदाज आहे पाहा… कुठे ओढाताण नाही… कुठेही अट्टाहास नाही… आणि शब्दांनी असा थेट हल्ला करावा तर भटसाहेबांनीच!
‘गंजल्या ओठांस माझ्या धार वज्राची मिळू दे,
आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे’
ह्या ओळी किंवा मग
‘पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी
जीवनापासून माझ्या या मला मुक्ती मिळावी’
या प्रखर वास्तववादी ओळी लिहिणारे भटसाहेब त्यांच्या एका पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहितात की, नद्या आणि समुद्राचे प्रेमभंग होत नाहीत आणि कोणत्याही दंगलीत झाडे कापली गेलेली माझ्या पाहण्यात नाही. मी माणसांविषयी लिहितो. मला खूप आवडतो हा विचार.
मला कमाल ह्या गोष्टीची वाटते की, हेच भटसाहेब जेव्हा शृंगारिक लिहितात तेव्हा एवढं नाजूक, एवढं अलवार कसं लिहू शकतात?… ‘केव्हातरी पहाटे उलटून रात्र गेली’ असेल किंवा
‘तुझ्या कळ्या, तुझी फुले इथे टिपून काढतो,
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो’ असेल.. हेच ते प्रखर लिहिणारे भटसाहेब ह्यावर विश्वास बसत नाही. भटसाहेबांची एक दवबिंदू पडलेल्या गुलाबाइतकी टपोरी कविता म्हणजे,
‘सजण दारी उभा, काय आता करू?
घर कधी आवरू, मज कधी सावरू?’ हे मी केलेलं असं एकमेव गाणं ज्यात पहिला अंतरा स्वरबद्ध केल्यानंतर अनेक वर्ष गाणं अर्धवट होतं…
‘मी न केली सखी अजून वेणीफणी,
मी न पुरते मला निरखले दर्पणी
अन् सडाही न मी टाकिला अंगणी,
राहिले नाहणे कुठून काजळ भरू?
घर कधी आवरू, मज कधी सावरू…
सजण दारी उभा…’
एका नवथर तरुणीची लगबग… तिचा प्रियकर तिच्या घरी प्रथमच येतोय. अगदी दारात आलाय आणि मग तिची होणारी धावपळ… मनाची घालमेल इतकंच उमटलं तेव्हा, माझ्या मनात दहा वर्षांपूर्वी. पण त्यानंतर जवळ जवळ सात वर्षांनी ‘क्षण अमृताचे’ ह्या सीडीच्या निमित्तानं ‘आता विसाव्याचे क्षण’ या गाण्याच्या तालमीसाठी लतादीदींच्या घरी पोचलो आणि त्यांच्या घराच्या दाराबाहेर उभा असताना,
‘मी न दुबळी कुडी अजून श्रृंगारिली,
मी न सगळीच ही आसवे माळली
प्राणपूजा न मी अजूनही बांधली,
काय दारातुनी परत मागे फिरू?
सजण दारी उभा…’ ह्या ओळी अनुभवल्या आणि ह्या गाण्याचा प्रवाह पुन्हा वाहता झाला. एकदम जाणवलं ‘सजण’ म्हणजे परमेश्वर!! अजून आपली काहीच तयारी नाही आणि दारापलीकडे प्रत्यक्ष संगीताचा परमेश्वर लतादीदी… आणि मग पुन्हा अख्खी कविता नव्याने उलगडली, प्रत्येक ओळीचा संदर्भ बदलला. ‘घर कधी आवरू? मज कधी सावरू?’मध्ये नवथर तरुणीही दिसते आणि मोहमायेचा पसारा मांडून बसलेले आपण सगळेसुद्धा! आपण एकीकडे म्हणतो, ‘देवा दर्शन दे’ पण तो दारात आला तर आपली तयारी आहे का, त्याच्या डोळ्यांला डोळा द्यायची? आपल्या मनाची तेवढी आवराआवरी झालीये का? एक वेगळीच अनुभूती ह्या कवितेतून आली आणि मग शेवटच्या कडव्यातला मधुराभक्तीचा संदर्भही अधिक खोल आणि गहिरा वाटला,
‘बघ पुन्हा वाजली थाप दारावरी,
हीच मी ऐकली जन्मजन्मांतरी
तीच मी राधिका, तोच हा श्रीहरी,
हृदय माझे कसे मीच हृदयी धरू?
घर कधी आवरू? मज कधी सावरू?
सजण दारी उभा…’
‘हीच’ ती थाप जी प्रत्येक जन्मात ऐकू येते, कुठल्या ना कुठल्या वळणावर खूण पटते की हीच ती हाक आणि हीच ती नजर… ह्या कवितेचं इतकं सहज गाणं झालं, खरंतर भटसाहेबांच्या ओळींना तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी मी गुणगुणलो इतकंच!
‘दिवा लागू दे रे देवा’ ह्या संग्रहासाठी आर्या आंबेकरला हे गाणं शिकवताना, कविता समजावून सांगताना पुन्हा एकदा या कवितेचा आनंद मला मिळाला. पुढच्या पिढीच्या गायकांना गाणं शिकवताना कवितेची मजा, त्यातलं सौंदर्य संगीतकारांनी समजावून सांगायलाच हवं, कारण ते गायकच पुढे त्यांच्या मैफिलीतून पुढची पिढी समृद्ध करतील.
कविता प्रत्येक वेळेला वेगळी जाणवू शकते, ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे मला भेटलेली भटसाहेबांची ही कविता.
‘हृदय माझे कसे मीच हृदयी धरू?’ एखादा शिलालेख असावा इतकी सुंदर ओळ… ‘तो’ आणि ‘ती’ ह्यांचं नातं उलगडणारी… मला दहा वर्षांनंतर नव्याने उलगडलेली ही कविता… अजून दहा वर्षानंतर कदाचित अजून उलगडेल… तोपर्यंत ती आळवत राहायला हवं… त्या वाटेवरून पुन्हा पुन्हा जायला हवं.. कारण कलाकृती तशीच राहते, पण आपण वेगळे असतो… दर काही वर्षांनी!

Tuesday, February 21, 2017

और नहीं बस और नहीं -



चित्रपट / Film: Roti Kapada Aur Makaan
गीतकार / Lyricist: Santosh Anand

गायक / Singer(s): महेन्द्र कपूर-(Mahendra Kapoor)और नहीं बस और नहीं, ग़म के प्याले और नहीं 
दिल में जगह नहीं बाकी, रोक नजर अपनी साकी तो
और नहीं बस ...

१) सपने नहीं यहाँ तेरे, अपने नहीं यहाँ तेरे 
सच्चाई का मोल नहीं, चुप हो जा कुछ बोल नहीं 
प्यार प्रीत चिल्लाएगा तो, अपना गला गँवाएगा 
पत्थर रख ले सीने पर, क़समें खा ले जीने पर 
गौर नहीं है और नहीं, परवानों पर गौर नहीं 
आँसू आँसू ढलते हैं, अंगारों पर चलते हैं तो 
और नहीं बस और नहीं ...

२) कितना पढ़ूँ ज़माने को, कितना गढ़ूँ ज़माने को 
कौन गुणों को गिनता है, कौन दुखों को चुनता है 
हमदर्दी काफ़ूर हुई, नेकी चकनाचूर हुई 
जी करता बस खो जाऊँ, कफ़न ओढ़कर सो जाऊँ 
दौर नहीं ये और नहीं, इन्सानों का दौर नहीं 
फ़र्ज़ यहाँ पर फ़र्ज़ी है, असली तो खुदगर्ज़ी है तो 
और नहीं बस और नहीं ...

३) बीमार हो गई दुनिया, बेकार हो गई दुनिया 
मरने लगी शरम अब तो, बिकने लगे सनम अब तो 
ये रात है नज़ारों की, गैरों के साथ यारों की 
जी है बिगाड़ दूँ सारी, दुनिया उजाड़ दूँ सारी 
ज़ोर नहीं है ज़ोर नहीं, दिल पे किसी का ज़ोर नहीं 
कोई याद मचल जाए, सारा आलम जल जाए तो 
और नहीं बस और नहीं ...

और नहीं बस और नहीं, ग़म के प्याले और नहीं 
दिल में जगह नहीं बाकी, रोक नजर अपनी साकी तो
और नहीं बस ...

१) सपने नहीं यहाँ तेरे, अपने नहीं यहाँ तेरे 
सच्चाई का मोल नहीं, चुप हो जा कुछ बोल नहीं 
प्यार प्रीत चिल्लाएगा तो, अपना गला गँवाएगा 
पत्थर रख ले सीने पर, क़समें खा ले जीने पर 
गौर नहीं है और नहीं, परवानों पर गौर नहीं 
आँसू आँसू ढलते हैं, अंगारों पर चलते हैं तो 
और नहीं बस और नहीं ...

२) कितना पढ़ूँ ज़माने को, कितना गढ़ूँ ज़माने को 
कौन गुणों को गिनता है, कौन दुखों को चुनता है 
हमदर्दी काफ़ूर हुई, नेकी चकनाचूर हुई 
जी करता बस खो जाऊँ, कफ़न ओढ़कर सो जाऊँ 
दौर नहीं ये और नहीं, इन्सानों का दौर नहीं 
फ़र्ज़ यहाँ पर फ़र्ज़ी है, असली तो खुदगर्ज़ी है तो 
और नहीं बस और नहीं ...

३) बीमार हो गई दुनिया, बेकार हो गई दुनिया 
मरने लगी शरम अब तो, बिकने लगे सनम अब तो 
ये रात है नज़ारों की, गैरों के साथ यारों की 
जी है बिगाड़ दूँ सारी, दुनिया उजाड़ दूँ सारी 
ज़ोर नहीं है ज़ोर नहीं, दिल पे किसी का ज़ोर नहीं 
कोई याद मचल जाए, सारा आलम जल जाए तो 
और नहीं बस और नहीं ...

Monday, January 23, 2017

मुलान्बद्दल -- खलिल जिब्रान

On Children Kahlil Gibran




तुमचीमुले हि तुमची नसतात
ती असतात जीवनाच्या स्वताविषयीच्या आसक्तीची अपत्ये
ती तुमच्या माध्यमातून प्रकटतात , तुमच्यापासून नाही
तुमच्या बरोबर राहत असली तरी त्यांच्यावर मालकी तुमची नसते
तुम्ही त्यांना प्रेम द्या ; विचारांची सक्ती करू नका
कारण त्यांना स्वताचे विचार असतात
तुम्ही त्यांची शारीरिक वाढ करता; पणआत्म्याचा विकास नाही
त्यांचे आत्मे भविष्यातीलपरिस्थितीत राहण्यासाठी घडत असतात
ज्याची तुम्ही कल्पना करू शकत नाही ; तुमच्या स्वप्नातसुद्धा
तुम्ही त्यांच्यासारखे होण्याचा प्रयत्न करू शकता
पण त्यांना तुमच्या सारखे बनवण्याचा प्रयत्न करू नका
कारण आयुष्य मागे जात नाही ; न थांबत नाही भूतकाळात जास्त वेळ
तुम्ही तुमच्या मुलांसाठीची धनुष्ये आहात
ज्या वरून जिवंत बाण पुढे सोडले जातात
धनुर्धारी अनंतातील लक्ष्याचा वेध घेत असतो
तो तुम्हाला ताकदीने वाकायला लावतो
ज्यामुळे त्याचे बाण अलगद आणि दूरपर्यंत जातील
तुमचे श्रम आणि कष्ट आनंदाने सहन करा
त्याचे उडणार्याबाणांवर जसे प्रेम असते
तेवढेचस्थिर धनुष्यावर सुद्धा असते!

अनुवाद-चारुदत्त

Your children are not your children.
They are the sons and daughters of Life's longing for itself.
They come through you but not from you,
And though they are with you yet they belong not to you.
You may give them your love but not your thoughts,
For they have their own thoughts.
You may house their bodies but not their souls,
For their souls dwell in the house of tomorrow,
which you cannot visit, not even in your dreams.
You may strive to be like them,
but seek not to make them like you.
For life goes not backward nor tarries with yesterday.
You are the bows from which your children
as living arrows are sent forth.
The archer sees the mark upon the path of the infinite,
and He bends you with His might
that His arrows may go swift and far.
Let your bending in the archer's hand be for gladness;
For even as He loves the arrow that flies,

so He loves also the bow that is stable.

Friday, December 23, 2016

जूठे नैना बोले - गुलजार




खोटे डोळे खऱ्या गोष्टी सांगताहेत
काळ्या रात्रीतील चंद्राप्रमाणे चमकताहेत

प्रियातुझ्या खोटे बोलाण्यामागचे कारण मी जाणून आहे
कोणत्यासवतीबरोबरतू रात्र घालवलीस
आताखोट्या खोट्या गोष्टी सांगू नकोस
कशी वाटली ती काळी सुंदरतरुणी?
जिला तू माझी अंगठी दिलीस
आता गोड गोड गोष्टी बोलू नकोस!


चित्रपट / Film: Lekin
संगीतकार / Music Director: हृदयनाथ मंगेशकर
गीतकार / Lyricist: गुलजार
गायक / Singer(s): आशा भोसले; सत्यशील देशपांडे

स: निके घूँघरिया ठुमकत चाल चलत

आ: जूठे नैना बोले सांची बतियां (२)
नित चमकावे चाँद काली रतियां
जूठे नैना बोले सांची बतियां (२)

जानू जानू झूठे माही की जात (३)
किन सौतन संग तुम काटी रात
अब लिपटी लिपटी
अब लिपटी लिपटी बनाओ न बतियां
झूठे नैना बोले सांची बतियां (२)

बोलो बोलो कैसी भायी सांवरी (३)
जिस को दे दे नी मोरी मुन्दरी
अब भीनी भीनी
अब भीनी भीनी बनाओ ना बतियां
जूठे नैना बोले सांची बतियां (२)
नित चमकावे चाँद काली रतियां

जूठे नैना बोले सांची बतियां

Friday, December 16, 2016

मोहे पनघट पे नन्दलाल- शकील बदायुनी



नंदलाल (कृष्णाने ) पाणवठ्यावर माझी छेड काढली
माझ्या नाजूक मनगटाला पीळ दिला
गलोरीने नेम धरून माझी घागर फोडून टाकली
माझी सगळी साडी भिजून गेली
डोळ्यांनी जादू केली माझा जीव चोरून घेतला
माझा घुंगट नजरेने तोडून टाकला 

अनुवाद- चारुदत्त कुळकर्णी
Movie/Album: मुग़ल-ए-आज़म (1960)
Music By: 
नौशाद अली
Lyrics By: 
शकील बदायुनी
Performed By: 
लता मंगेशकर
मोहे पनघट पे नन्दलाल छेड़ गयो रे
मोरी नाजुक कलईया मरोड़ गयो रे
मोहे पनघट पे...
कंकरी मोहे मारीगगरिया फोर डारी
मोरी सारी अनारी भिगोय गयो रे
मोहे पनघट पे...
नैनों से जादू कियाजियरा मोह लिया
मोरा घूँघटा नजरियो से तोड़ गयो रे

Friday, December 9, 2016

दिल हूम हूम करे-गुलज़ार



हृदय धडधड करतयघाबरले आहे
ढग गडगडत आहेत , भीती वाटतेय
हळूच  पाण्याचा एखादा थेंबमाझ्या डोळ्यातून ओघळतोय 

ज्या शरीराला  तुझा स्पर्श झाला,ते मी कसे लपवू ?
तुझ्या नजरांनी  घायाळ झालेलं काळीज ; कोणाला दाखवू ?

तुला देण्यासारखे ,सुकलेल्या पानांशिवाय माझ्याजवळ काही नाही
तुझा स्पर्श झाला कि , माझी वठलेली काया बहरेल
हे माझ्या चंद्रमा ; तुझी चांदणी आगीत होरपळतेय
तू उंच शिखरावर उभा आहेस ; मी माझे पंख कापले आहेत !

अनुवाद - चारुदत्त कुलकर्णी



दिल हूम हूम करे - Dil Hoom Hoom Kare (Lata Mangeshkar, Bhupen Hazarika)

Movie/Album: रुदाली (1993)
Music By: भूपेन हजारिका
Lyrics By: गुलज़ार
Performed By: भूपेन हजारिका, लता मंगेशकर

दिल हूम हूम करे, घबराए
घन धम धम करे, डर जाए
इक बूँद कभी पानी की
मोरी अंखियों से बरसाए

तेरी झोरी डारूं, सब सूखे पात जो आये
तेरा छूंआ लागे, मेरी सुखी डार हरियाए
दिल हूम हूम करे...

जिस तन को छुआ तुने, उस तन को छुपाऊँ
जिस मन को लागे नैना, वो किसको दिखाऊँ
ओ मोरे चन्द्रमा, तेरी चांदनी अंग जलाए
ऊंची तोर अटारी, मैंने पंख लिए कटवाए
दिल हूम हूम करे...