Thursday, November 28, 2019

आफ्रीन आफ्रीन । जावेद अख्तर

मी त्याचे मराठीत भाषांतर करण्याचा प्रयत्न करत आहे


❤❤❤❤❤
तिच्या सौदर्याचे वर्णन करायला शब्दच नाहीत
प्रभो तू धन्य आहेस (तिला निर्माण केलंस)

तू तिला बघितलंस तरी हेच म्हणशील



इतकं सुंदर कोणी पाहिलं नाही
शरीर अजंठ्याच्या मूर्तीसारखं आहे
तिचं शरीर म्हणजे नजरेवरील जादू
तिचं शरीर म्हणजे सुंदर गाणं, किंवा गोड सुगंध
किंवा रागातील सुंदर तान
किंवा बहर आलेली बाग
किंवा सूर्याचे कोवळे किरण
किंवा अप्रतिम शिल्प,हृदयाचे ठोके बंद  पडेल असे,
चंदनाचा सुवास
शुभ्र संगमरवरी



चेहरा एखादया फुलासारखा प्रसन्न,
तो चेहरा आहे का जणू चंद्र,
तिचा चेहरा म्हणजे जणू गझल , किंवा गझलेचे हृदय,
चेहरा म्हणजे उमलती कळी, किंवा कमळाचे फुल,
चेहरा म्हणजे कल्पनाशक्तीला अभ्यास,
चेहरा म्हणजे एक स्वप्न ,आणि त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न!



चेहरा म्हणजे एक परीकथा,
क्षणात वास्तव आणि क्षणात कल्पनाविलास,
तिचा चेहरा अद्वितीय,कपाळ म्हणजे दुसरा चंद्र।।

तिच्या डोळ्यात बघितल आणि मी पाहतच राहिलो,
जसे दोन मदिरेचे प्याले, चकाकणारे,
हे दोन डोळे आहेत की मधूशाळेचे दरवाजे,
मी त्यांना माझ्या स्वपनांचे डोळे का म्हणू नये,
ते खाली पाहतात तेंव्हा साक्षात लज्जा होतात,आणि आकाशा कडे पाहताना साक्षात प्रार्थना होतात,
वरपासून खाली पाहते ती नजाकत असते, पण खालुन वर पाहते ती शिक्षा होते।।

दोन डोळ्यात पृथ्वी आणि आकाश पकडले जातात,
तिचे डोळे स्वर्गातल्या फुलाप्रमाणे, काजळ घातलेलं,

तिच्या लांब केसांची गोष्ट प्रदीर्घ आहे,
त्याच्या सावल्या माझ्या हृदयावर पडलेल्या आहेत
केस असे की चकाकणारे काळे ढग एकमेकात अडकलेले
केस असे की जणू येणारे काळे संकट,
केस गुंतायला लागले की जग परेशान होते,
केस सरळ झाले की सहज कविता सुचतात,
केस विखरले की रात्र व्हायला लागते,
केस उडायला लागले की रात्र गाऊ लागते,
केस म्हणजे एक हातकडी आहे,पण खूप सुंदर,
किती मुलायम रेशमी, आकाशा सारखे....

तिच्या सौदर्याचे वर्णन करण शक्य नाही
प्रभू तू थोर आहेस, तू तिला निर्मित केलेस

शायर.. जावेद अख्तर

अनुवाद प्रयत्न... चारुदत्त कुलकर्णी


❤❤❤❤❤❤❤❤जावेद अख्तर ने आपल्या प्रेयसीच वर्णन केले आहे


आफरीं आफरीं - Aafreen Aafreen (Nusrat Fateh Ali Khan, Sangam)

Movie/Album: संगम (1996)
Music By: नुसरत फ़तेह अली खान
Lyrics By: जावेद अख्तर
Performed By: नुसरत फ़तेह अली खान

उसने जाना की तारीफ़ मुमकिन नहीं
आफरीं-आफरीं...
तू भी देखे अगर, तो कहे हमनशीं
आफरीं-आफरीं...
हुस्न-ए-जाना...

ऐसा देखा नहीं खूबसूरत कोई
जिस्म जैसे अजंता की मूरत कोई
जिस्म जैसे निगाहों पे जादू कोई
जिस्म नगमा कोई, जिस्म खुशबू कोई
जिस्म जैसे मचलती हुई रागिनी
जिस्म जैसे महकती हुई चांदनी
जिस्म जैसे के खिलता हुआ इक चमन
जिस्म जैसे के सूरज की पहली किरण
जिस्म तरशा हुआ दिलकश-ओ-दिलनशीं
संदली-संदली, मरमरी-मरमरी
आफरीं-आफरीं...

चेहरा इक फूल की तरह शादाब है
चेहरा उसका है या कोई महताब है
चेहरा जैसे ग़ज़ल, चेहरा जाने ग़ज़ल
चेहरा जैसे कली, चेहरा जैसे कँवल
चेहरा जैसे तसव्वुर भी, तस्वीर भी
चेहरा इक ख्वाब भी, चेहरा ताबीर भी
चेहरा कोई अलिफ़ लैल की दास्ताँ
चेहरा इक पल यकीं, चेहरा इक पल गुमां
चेहरा जैसा के चेहरा कहीं भी नहीं
माहरू-माहरू, महजबीं-महजबीं
आफरीन आफरीन...

आँखें देखी तो मैं देखता रह गया
जाम दो और दोनों ही दो आतशां
आँखें या मैकदे की ये दो बाब हैं
आँखें इनको कहूँ, या कहूँ ख्वाब हैं
आँखें नीचे हुईं तो हया बन गयीं
आँखें ऊँची हुईं तो दुआ बन गयीं
आँखें उठाकर झुकीं तो अदा बन गयीं
आँखें झुकाकर उठीं तो कदा बन गयीं
आँखें जिनमें है क़ैद आसमां और ज़मीं
नरगिसी-नरगिसी, सुरमई-सुरमई
आफरीन-आफरीन...

ज़ुल्फ़-ए-जाना की भी लम्बी है दास्ताँ
ज़ुल्फ़ की मेरे दिल पर है परछाईयाँ
ज़ुल्फ़ जैसे के उमड़ी हुई हो घटा
ज़ुल्फ़ जैसे के हो कोई काली बला
ज़ुल्फ़ उलझे तो दुनिया परेशान हो
ज़ुल्फ़ सुलझे तो ये दीद आसान हो
ज़ुल्फ़ बिखरे सियाह रात छाने लगी
ज़ुल्फ़ लहराए तो रात जाने लगी
ज़ुल्फ़ ज़ंजीर है, फिर भी कितनी हसीं
रेशमी-रेशमी, अम्बरी-अम्बरी
आफरीं-आफरीं...

Wednesday, November 27, 2019

ऐसान होगा तेरा मुझपर

एहसान तेरा होगा मुझपर

स्रोत: विवेक मराठी    दिनांक27-Nov-2019  

मोहम्मद रफी यांनी गीत गाताना सुरांबरोबर अनेक भावनांनासुध्दा गुंफले आहे. तिच्याविषयीचे आत्यंतिक प्रेम, ती दुखावली गेल्याने झालेला खेद, माफी मागताना दाटून आलेला पश्चाताप या साऱ्याचे दर्शन रफींच्या आवाजात आणि शम्मीच्या अभिनयात होते.

 

1955चा काळ. राणीखेत या प्रदेशात 'रंगीन रातें' या चित्रपडाचे चित्रीकरण चालू होते. चित्रपटाचा नायक शम्मी कपूर. तेव्हा तो नवोदित होता. त्याच्यासमोर होती त्या वेळची प्रसिध्द नटी गीता बाली.

तेथील निसर्गरम्य वातावरण, त्याला शोभेशी चित्रपटात असलेली सुंदर गाणी, प्रेमकथा या पार्श्वभूमीवर ती आली, तिने पाहिले, ती जिंकली आणि हा पठ्ठया प्रेमात पडला. कसलेही दडपण न ठेवता त्याने सरळ तिथेच गीताला मागणी घातली. काही महिने वाट पाहण्यात गेले आणि जेव्हा तिचा होकार मिळाला, तेव्हा घरच्यांच्या विरोधाला न जुमानता या दोघांनी मुंबईतील बाणगंगा येथील एका देवालयात पहाटे चार वाजता पुजाऱ्याला उठवून लग्न केले. नंतर घरच्यांचा आशीर्वाद घ्यायला घर गाठले. एका सिनेमात शोभेल असा हा प्रसंग. खात्री आहे की जेव्हा गीताने होकार दिला, तेव्हा याने जंगली या चित्रपटासारखीच 'याहू' आरोळी ठोकली असणार.

जशी शम्मी कपूरची प्रेमकहाणी सरळ आणि प्रामाणिक, तसेच त्याचे चित्रपट. त्यात श्रीमंत आणि गरीब यातील झगडा असायचा. शम्मीच्या वाटयाला श्रीमंत मुलाची भूमिका यायची. एवढा गोरागोमटा आणि धट्टाकट्टा, गरीब म्हणून शोभलाच नसता. सुंदर, गुणी पण गरीब नायिका, घरातून होणारा विरोध, तोंडाला लावायला खलनायक आणि या सर्वांच्या समवेत असायची सुरेल गाणी.

ही गाणी नायिकांच्या सुंदरतेची स्तुती करणारी. त्यांनी केवळ स्तुतीच केली नाही, त्यांना हृदयात बसवले, त्यांची पूजा केली, त्यांना लाडावून ठेवले, त्यांचा आदर केला, अफाट प्रेम केले आणि त्या प्रेमाने त्यांना जिंकले. चित्रपटसृष्टीत नायकाला जिथे नायिकेकडून 'अब हमें आपके कदमों मे यूं रहना होगा' हे गाणे ऐकायची सवय आहे, त्या जमान्यात शम्मी 'एहसान तेरा होगा मुझपर, दिल चाहता है वो कहने दो' सहज सांगून गेला.

जंगली या सिनेमाची कथा एका वाक्यात सांगता येईल - एका करारी, कडक, अरसिक माणसात केवळ प्रेमामुळे घडलेला बदल.

 

शेखर (शम्मी) परदेशातून परत येऊन वडिलांचा व्यवसाय ताब्यात घेतो. लहानपण एका करारी, शिस्तप्रिय आईबरोबर गेलेले असल्याने स्वभाव काहीसा आक्रमक आणि उध्दट.

तो काश्मीरला गेलेला असताना तेथील स्थानिक डॉक्टरची मुलगी राजकुमारीशी (सायरा बानू) त्याची भेट होते. तिचे हसणे, तिचे मार्दवी बोलणे याचा त्याला सुरुवातीला रागच येतो. चित्रपटात मात्र काही असे प्रसंग घडतात की राजकुमारी शेखरला बदलवण्याची जबाबदारी घेते. त्याचा संताप, त्याचे दुर्लक्ष करणे, ओरडणे याचा तिच्यावर काहीही परिणाम होत नाही. आतापर्यंत ज्या मुलींचा शेखरला अनुभव असतो, ज्या माणसांना त्याने पाहिलेले असते, त्याहून ही मुलगी वेगळी असते. तिची निरागसता, तिचे अनाघ्रात सौंदर्य, तिची आश्वासकता, तिचे आर्जव, तिचा अवखळपणा या साऱ्याच गोष्टी शेखरला आकर्षित करून घेतात. प्रेमाची ओळखही नसलेला शेखर राजच्या प्रेमात आकंठ बुडतो.

प्रेमाचा रस्ता मात्र सरळ नसतो. फुलांच्या पायघडयांवर चालताना काटयांचाही सामना करावा लागतो. शेखरची आई राजचा अपमान करते. पैशासाठी आपल्या मुलाला जाळयात अडकवल्याचा आरोप करते. तिच्या दुखावलेल्या मनावर फुंकर घालताना शेखर म्हणतो,

एहसान तेरा होगा मुझ पर

दिल चाहता है वो कहने दो

मुझे तुमसे मोहब्बत हो गयी है

मुझे पलको की छाँव में रहने दो

 

प्रेमात कृतज्ञतेला जागा असते का? खरे तर प्रेम समान पायावर असावे, मग त्या दोघांची समाजात जागा कुठेही असो. एकाची गरज जेवढी तीव्रतेने आहे, तेवढीच जर दुसऱ्याची नसेल, जर दोन्हीकडची ओढ सारखी नसेल, तर एकासाठी ते कृतज्ञतेचे आणि दुसऱ्यासाठी उपकाराचे ओझे होते. पण इथे अहंकाराला जागा नाही. ती निष्पाप आहे, हे त्याला माहीत आहे. आईला उलटून बोलणे जरी त्याला जमत नाही, तरीही तिचा अपमान त्याला सहन होत नाही. आपल्यात तिने जो बदल घडवून आणला, त्याची त्याला जाणीव आहे. एका अहंकारी माणसाच्या मनाला प्रेमाचा स्पर्श करण्याची जादू तिने केली आहे, याबद्दल तो कृतज्ञसुध्दा आहे.

तिचा राग हा काही रूठे रूठे पियाचा हा लटका राग नाही, म्हणून तो विनवतो,


तुमने मुझको हँसना सिखाया

रोने कहोगे रो लेंगे अब

ऑंसूँ का हमारे गम ना करो

वो बहते हैं तो बहने दो

आपल्या आयुष्यात आपल्यावर प्रेम करणारी अनेक माणसे असतात. या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या लोकांसाठी बरेच काही करतो, त्यांनी केलेले पाहतो, मनातून सुखावतो, पण ते सुख त्यांच्यापर्यंत पोहोचवत नाही. त्यांचे असणे एवढे गृहीत धरलेले असते की मनातल्या भावना मनात राहतात.

काळ कुणासाठीही थांबत नाही. दिवसाच्या उदरात काय दडले असते, ते सांगता येत नाही. जवळच्या माणसांशी साधलेला संवाद ही खरे तर सर्वात मोठी भेट असते. नाते टिकवणारी रेशीमगाठ असते.

मोहम्मद रफी यांनी गीत गाताना सुरांबरोबर अनेक भावनांनासुध्दा गुंफले आहे. तिच्याविषयीचे आत्यंतिक प्रेम, ती दुखावली गेल्याने झालेला खेद, माफी मागताना दाटून आलेला पश्चाताप या साऱ्याचे दर्शन रफींच्या आवाजात आणि शम्मीच्या अभिनयात होते. यातला मोहब्बत हा शब्द तर रफीजींनी किती वेगवेगळया तऱ्हांनी गायला आहे.

याच चित्रपटातले 'चाहे कोई मुझे जंगली कहे' हे गीत अतिशय प्रसिध्द आहे. तरीही चित्रीकरण, शब्द, सूर आणि अभिनयाच्या अंगांनी विचार केला, तर हे गीत बाजी मारून जाते. याच गीतात लक्षात येते की, एका जंगली माणसाला प्रेमाने पूर्ण बदलवले आहे. ह्या गीतातील प्रेमाचा उघड इजहार इतका हळुवार आहे की नायिकेचा रागसुध्दा त्या सुरांनी वितळतो.

हे गीत फक्त रफीजींच्या आवाजात रेकॉर्ड होणार होते. त्या सुरांची मोहिनीच एवढी अफाट की परत लताजींच्या आवाजात रेकॉर्ड करायचा मोह शंकर-जयकिशन यांना टाळता आला नाही.

 

आईच्या हट्टापुढे नमून शेखर, राजशी लग्न न करण्याचे वचन देतो खरा, पण त्याच वेळी ती सोडून कुणाशीही लग्न न करण्याची शपथ घेतो. अशा प्रियकरावर जीव ओवाळून टाकावासा कुणाला वाटणार नाही! प्रेमाचे हे उदात्त दर्शन दिपवून टाकणारे. नवल नाही की नायिकासुध्दा त्या सुरांत सूर मिळवताना म्हणते,

 

चाहे बना दो चाहे मिटा दो

मर भी गये तो देंगे दुवाएँ

उड़ उड़ के कहेगी खाक सनम

ये दर्द ए मोहब्बत सहने दो

मुझे तुमसे मोहब्बत हो गयी है

मुझे पलको की छाँव में रहने दो।


Monday, November 25, 2019

महाराष्ट्र सरकार

[मी पुन्हा येईन,
मी पुन्हा येईन,
मी पुन्हा येईन...

पण इतक्या सकाळी सकाळी याल अस वाटलं नव्हतं

Xxxxxxxxxxxx
[भाजपा पहिल्या दिवसापासून Wait & Watch अस म्हणत होत, आज कळले Watch म्हणजे "घड्याळ" !! 

Xxxxxxxxx
 *सब देखते ही रह गए... और प्यार हो गया...*

BJP ❤ NCP

Xxxxx
[जब तक नाड़े का जुगाड़ ना हो,
पजामा नहीं पहनना चाहिए...!

शिवसेना को समर्पित 🙏

Xxxxx
 सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्युज---- 
 *२३ नोव्हेंबर | जागतिक पोपट दिवस!* 
 - युनेस्को


Qwert
Uddhav is CM in print media
Fadnavis is CM in electronic

Technology these days 

Xxxxxxxxxx
[: *आजच्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीचे एका वाक्यात विश्लेषण*         मुलीला इतके ही स्थळ दाखऊ नका, की ती कंटाळून दुसऱ्या बरोबर पळून जाईल

Xxxxxxxx
: "घडी" 🕙

"पहले इस्तेमाल करें..
फिर विश्वास करें....!!" 
😂😂😂😂


 Vdp subodh: आजची शिकवणूक
१.कमी बोला
२.आणि सकाळी लवकर उठा
😁😁😁


[: लीलावती हॉस्पिटल मधून संजय राऊत यांना फोन..

 *"तुम्ही येता की आम्हीच ॲम्बुलन्स पाठवू.."🤣*


Xxxxxxxx
 सूत्र कायम दगा देतात,
शाळेत सुद्धा द्यायची

Xxx
आमच्या कडे अर्ध्या किंमतीत पेढे मिळतील...!

-संजय राऊत

Xxccxx
[23/11, 1:56 pm] Charudatta: आता अजून एक गंमत सांगतो, 
कायद्याचा सुद्धा अभ्यास नीट असावा लागतो, आजचा सगळ्यात मोठा गेम म्हणजे अजितदादांची निवड राष्ट्रवादी चे गटनेते म्हणून केली, त्यांनी भाजप ला पाठिंबा गटनेता म्हणून दिला, आता याविरोधात जर राष्ट्रवादी च्या आमदारांना जायचे असेल तर विरोधात 2/3 आमदार म्हणजे 37 आमदार पाहिजेत अन्यथा त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते।
सब कुछ गेम है।
Xxxxx

 इतरांच्या प्रातर्विधीचा पत्ता नाही आणि हे दोघं मॉर्निंग वॉकला जाऊन शपथविधी उरकून आले. 😜

Xxxxxxxx

: छमछम करती आई छमिया, छमछम करती चली गई,
मैं सिंदूर लिए खड़ा रहा, वो राखी बांध के चली गई 
~ शायर संजय राउत (शिवसेना वाले)

Xxxxx
[: Modi govt's first successful PSU (pawar-sonia-uddhav)  disinvestment 🤣



शस्त्रक्रिया यशस्वी 
~ शल्यविशारद ~
डाॅ.मोदी, डाॅ.शहा, 
डाॅ.पवार (जेष्ठ भूलतज्ञ)

Xxxxx

[ जादूगार शरद पवार यांचे भव्य जादूचे प्रयोग...

मुख्य आकर्षण : वाघाचा पोपट करून दाखवला जाईल...😝

Xxxx
 शेवटच्या क्षणी संपर्क तुटलेल्या यंदाच्या 2 गोष्टी:

*1. विक्रम लैंडर*
*2. शिवसेना*


xxxxxxx
[: Shivsena. ÷÷÷÷÷. 
रातभर केलं अन् आत नाही गेल !!!!
😔😔😔😔😔

BJP. -------- 
एकच ठोका अन् पाळण्याला झोका !!!!
😝😝😝😝😝😝

Xxxxx
: शहांनी म्हणे फक्त विचारलं 
" शु करे छे ?"

अजित दादा लगेच समर्थन द्यायला तयार...😁

Xxxxxx

थंडीत नीट झोपुन पण देत नाहीत आयघाले-
राज्यपाल😆🤣🤣😂😂


[: आज पुन्हा आपण शिकलो?
दिवसा मीटिंगला कधीच बसू नये
रात्री बसल्यावर सगळे प्रश्न सुटतात. 
😂😂😂😂😂🙈


*आजचा उखाणा :*

फडणवीसांच्या पुस्तकाला पवारांचं कव्हर ..
राष्ट्रवादी निघाली कमळाबाईची लव्हर......!!!

Xxxx

[अजित पवारांनी शरद पवारांना दगा दिला , शरद पवारांना याबाबत काही माहीत नाही.- संजय राऊत...


आता यांना कोण समजवनार ..
गंगाधर ही शक्तीमान है...

Xxxxxxx.
[: Breaking news: Trump is applying for student visa in India to learn political science


[23/11, 8:29 pm] Dr Anand Dhavle: आमचा एक मित्र आधी मोदी भक्त होता तेव्हा पवाराला शिव्या देत होता मग पवार भक्त झाला आणि मोदीला शिव्या दिल्या...आता ते दोघे एक झाले..आता स्वतःला शिव्या देतंय🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣


[23/11, 10:19 pm] +91 94225 80870: NEXT QUESTION IN KBC..
सकाळी सगळ्यात लवकर कोण उठतो?
१: कोंबडा.         २: दुधवाला   
३:पेपरवाला       ४: राज्यपाल
😅😅😅


[23/11, 10:49 pm] Milind Naniwadek: इथं गावचा तलाठी ८ दिवस भेटतं नाही आणि राज्यपाल दिवस बगना रात बगना 😂

*लय कामाचा माणूस हाय*😂


Xxxxxx

[24/11, 9:42 am] Vdp subodh: म्हणून जुनी माणस साखरपुढ्यात आणि लग्नात जास्त अंतर ठेवत नव्हती... 
😜
Xzzzxx
[24/11, 9:51 am] Kumbhojkar Nachikt: एडमीन यांना नम्र विनंती! 

सध्या महाराष्ट्रात  प्रचंड प्रमाणात फोडाफोडी सुरू आहे..! तेव्हा आपले ग्रुपमेंबर्स फुटू नये म्हणून सर्वांना एखाद्या हिल स्टेशनवर किंवा किमान एखाद्या फाईव्ह स्टार रिसॉर्टमधे चारपाच दिवस नेऊन ठेवावेत आणि संभाव्य फूट टाळावि
क्सक्सक्सक्स
[24/11, 3:54 pm] Raja Dhavle N: आपल्याला नक्की कोणी कोणाच्या पाठीत खुपसलंय हे न कळल्यानं खंजीरही संभ्रमात

[24/11, 4:38 pm] Charudatta: *संजय राऊत छत्रपतींच उदाहरणं देतो..* 

*म्हणतो रात्रीत पाप होतं,*
*व्यभिचार होतो,*

*भाजपने पाप केलय...*

*मूर्ख लेकाचा....*

*इतिहास काय option ला टाकला होता काय शाळेत...*

*शाहिस्ते खानाचा वध, विशाल गडाकडे महाराजांनी* *केलेली कूच,अफझलखानाचा वध,* *आग्र्याहून सुटका...* 
*महाराज्यांच्या रात्र साथीला नसती तर महाराष्ट्र महाराष्ट्र नसता आणि आम्ही हिंदू नसतो....*
*गाढवा*
 

*गीतेच्या सांख्ययोगात श्रीकृष्ण म्हणतात* 

 *या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी । यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥ २-६९ ॥* 

*सर्व प्राण्यांच्या दृष्टीने जी रात्र असते, अशा रात्रीत  स्थितप्रज्ञ योगी जागत असतो  आणि ज्या नाशिवंत सांसारिक सुखाच्या प्राप्तीत सर्व प्राणी जागतात, ती अशा योग्याची रात्र असते..*

*जागा हो संजया... आहेस कुठे?*
क्सझक्सक्सक्स

*अलका देशपांडे*
[24/11, 7:37 pm] Charudatta: *भारतातील गाजलेलं ३० दिवसांचं नाटक*

*संगीत :- मी पुन्हा येईन*

लेखक :- देवेंद्र फडणवीस
पटकथा :- अमित शाह
संवाद :- संजय राऊत,आशिष शेलार,पृथ्वीराज चव्हाण
निर्माते :- BJP
प्रमुख भूमिका :- देवेंद्र,अजित,उद्धव
बालकलाकार :- आदित्य
विनोदी भूमिका :- संजय राऊत
पाहुने कलाकार :- सोनिया गांधी
सूत्रधार: शरद पवार
      
       
दिग्दर्शक
*नरेंद्र मोदी*
[24/11, 7:38 pm] Charudatta: *सकाळी लवकर उठवण्याची बायकोची भन्नाट कल्पना* ....
















ओ उठा....
























*अजित पवार नी राजीनामा दिला* 😳😳




खाड़कन डोळे उघडले न राव 😁😄😆😅
[24/11, 7:38 pm] Charudatta: राष्ट्रपती राजवट कधी लागली अन कधी संपली मला पण   सांगत जा रे बाबा 

- राष्ट्रपती
[24/11, 8:04 pm] Dr Anand Dhavle: *मुख्यमंत्री भाजप चा असावा की शिवसेनेचा ..*

*यासाठी दोन्ही काँग्रेस चे नेते रात्रंदिवस झटत आहेत.*

*आणखी कसले अच्छे दिन पाहिजेत* 
🤣🤣🤣😇😇😇
[25/11, 6:00 am] Dr Anand Dhavle: *महाराष्ट्रातल्या मतदारांनी आरोग्य उत्तम राहण्यासासाठी खालील गोष्टी कराव्यात .....😜😜😜😄😄😄 !*
-------------------------------

*1) जास्त वेळ T V वरील बातम्या व चर्चा पाहू नयेत !*😜
*2) आपापल्या चरितार्थाची कामे व्यवस्थित करावीत !*😜
*3) आपापला व्यवसाय / धंदा / नौकरी  यात लक्ष घालावे !* 😜
*4) कोणत्याही विचार धारेला आयुष्यभर चिटकून राहू नये !*😜
*5) राजकारणाकडे करमणूक म्हणून पहावे , जास्त मनाला लाऊन घेऊ नये !* 😜
*6) सत्ता कोणत्याही पक्षाची येवो , मुख्यमंत्री कुणीही होवो ...त्यांचे अभिनंदन करून स्वीकार करावा !* 😜
*7) फक्त आमदार कोण असावा या साठी मत देणे आपल्या हातात असते , ते आपण दिले .....पुढे त्यांनी कोणाशी युती करावी किंवा करू नये हा त्यांचा अधिकार असतो .....त्यामुळे चिडचिड करून बी.पी. व शुगर वाढवून घेऊ नये !*😜
*8) तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी व मतदारांनी उगी एकमेकांशी वैर करून घेऊ नये !* 😜
*9) सर्वांशी छान relations ठेवावेत !*😜
*10) मित्र हो कोणत्याच गोष्टीचा जास्त विचार करू नका , हसत-खेळत चर्चा करा , विनाकारण हमरी-तुमरी वर येणे , खउट मॅसेज करणे टाळावे , शेवटी आपली तबीयत महत्वाची आहे , हे कधीही विसरू नका !* 😜
*11) *शेवटी .....भारत माझा देश आहे व सारे भारतीय माझे बांधव आहेत*
[25/11, 2:19 pm] Charudatta: आजच्या राजकीय पार्श्वभूमीवर माझी एक कविता पुन्हा पोस्ट करत आहे.

आधी मतदान कर आणि मग बोलत बस, कोकलत  बस !!!

आघीपासून असलेले

आज आलेले,

काल आलेले,

परवा आलेले

मागच्या महिन्यात आलेले

मागील वर्षी आलेले

मागच्या निवडणुकीत आलेले

एकदा जाऊन परत आलेले

परत जाऊन परत आलेले

येऊन जाऊन असलेले

परत परत येऊन जाऊन असलेले

यातला एक निवडायचा आहे !!!

पक्षाशी निष्ठा असलेले जुने

पक्षाशी निष्ठा असलेले नवे

साहेबांशी निष्ठा असलेले जुने

साहेबांशी निष्ठा असलेले नवे

हृदयसम्राटाशी इमान असलेले जुने सैनिक

हृदयसम्राटाशी इमान आणलेले नवे सैनिक

गांधी नेहरूंचे मीठ खाल्लेले

गांधी नेहरूंचे मीठ खाण्यास आलेले

मोदींचे जुने भाट

मोदींचे नवे भाट

यातला एक निवडायचा आहे !!!

तुरुंगात गेलेले

जाऊन आलेले

तुरुंगात वाटेवरचे

आरोप झालेले

जामिनावर सुटलेले

जामीन अर्ज केलेले

पॅरोल वर सुटलेले

सुप्रीम कोर्टात गेलेले

हाय कोर्टात गेलेले

खालच्या कोर्टात अडकलेले

यातला एक निवडायचा आहे !!!

फुकट वीज

फुकट पाणी

कर्ज माफी

सबसिडी

फुकट राशन

फुकट बेकारभत्ता

फुकट यात्रा घडवणारा

फुकट रस्ते

बोलाची कढी

बोलाचा भात

यातील जास्तीत जास्त देऊ म्हणणारा

यातला एक निवडायचा आहे !!!

भाईचा माणूस

दादाचा माणूस

बाबाचा माणूस

अण्णाचा माणूस

अध्यक्षांचा माणूस

उपाध्यक्षाचा माणूस

साहेबांचा माणूस

जातीचा माणूस

धर्माचा माणूस

गावाचा माणूस

गुरूचा शिष्य

गटाचा माणूस

संघाचा माणूस

यातला एक निवडायचा आहे !!!

पक्षाचा अधिकृत

पक्षाचा अनधिकृत

पक्षात आयात केलेला

पक्षाने निर्यात केलेला

फिक्स झालेला

पाठींबा दिलेला

छुपा पाठींबा मिळालेला

आतून पाठींबा दिलेला

बाहेरून पाठींबा मिळालेला

आतून विरोध असलेला

बाहेरून विरोध असलेला

आपल्यातला त्यांचा

त्यांच्यातला आपला

यातला एक निवडायचा आहे !!!

शंभर कोटी जमवलेला

हजार कोटी बाळगून असलेला

गावो गावी जमिनी करणारा

बायकोला श्रीमंत करणारा

सासूच्या नावावर फ्लॅट घेणारा

मेव्हणीला जमीन घेउन देणारा

मेव्हण्याला पीए करणारा

भाजीवाल्याला flat घेऊन देणारा

ड्रायवरला कंपनी काढून देणारा

अम्बानिशी पार्टनरशिप असलेला

लवासाचे शेअर असलेला

यातला एक निवडायचा आहे !!!

सहकारमहर्षी

शिक्षणसम्राट

मद्यसम्राट

सहाराश्री

वाळूसम्राट

जमीनसम्राट

कोळसासम्राट

खाणसम्राट

हृदयसम्राट

धर्मसम्राट

धम्मसम्राट

यातला एक निवडायचा आहे !!!

छत्रपातींशी नाते असलेला

टिळकांशी नाते असलेला

ओबीसी असलेला

रिझर्वेशन असलेला

ओबीसी नसलेला

ओपन कॅटेगरीचा

एस सी असलेला

बी सी असलेला

यातला एक निवडायचा आहे !!!

कॉमनवेल्थमध्ये गेम केलेला

कोळशात काळा झालेला

जल संधारणात घोटाळा केलेला

महाराष्ट् सदनात गफला केलेला

टोळधाडीत सामील असलेला

बँकेत घोटाळे केलेला

मनरेगात घोटाळा केलेले

देवाच्या नावाने घोटाळा

गांधीच्या नावाने घोटाळा

ट्रस्टच्या नावाने घोटाळा

राडेबाजी करणारा

बस पेटवणांरा

ट्रेन जळणारा

कारच्या काचा फोडणारा

लोकांना भडकववणारा

बिल्डरचा पाठीराखा

झोपडपट्टीचा दादा

अतिक्रमण करणारा

अनधिकृत बांधकाम करणारा

यातला एक निवडायचा आहे !!!

कुणी अयोध्येच्या रामाच्या नावाने

कुणी मथुरेच्या कृष्णाच्या नावाने

कुणी काशीच्या विश्वेश्वराच्या नावाने

कुणी अल्लाच्या नावाने

कुणी सत्यसाईच्या नावाने

कुणी आसरामाच्या नावाने

कुणी नारायणसाईच्या नावाने

कुणी आम आदमीच्या नावाने

उभा आहे

तुझ्या साठी कोणी नसले तरी

यातला एक निवडायचा आहे !!!

मतदारा गड्या फार  मोठ्ठा choice आहे !

यादी फार मोठी आहे

मी फक्त सुरवात केली

तुझी तू वाढव यादी

मतदार गड्या तुला वेळ तरी कुठे आहे !

चल उठ कोणातरी एकावर ठप्पा मार

मग महागाईचा विचार कर

मग भ्रष्टाचारावर बोल

मग शिक्षणाच्या घसरणाऱ्या दर्जावर बोलत रहा

मग बेकारीवर बोल

मग बलात्कारावर चर्चा कर

मग वाढणाऱ्या विकास खर्चावर बोल

मग ढासळणांरया मूल्यांवर बोल

बोलत बस, बोलत बस आणि कोकलत बस

पुढची पाच वर्षे तुझीच आहेत

उगाच घाई करू नको

पहिले त्यांना निवडून दे

ती लोकशाहीची गरज आहे.

तुला तुझ्यावर शासन लागते,

तुला तुझ्यावर सरकार लागते,

तुला तुझ्यावर लोकसभा लागते,

तुला तुझ्यावर विधानसभा लागते

त्यांच्या शिवाय तुझे जीवन अधुरे आहे.

त्यांना पहिले निवडून दे

मग !!

आहेच कि, बाकी सगळे जागच्या जागी जिथल्या तिथे !!!

श्रीकांत कुलकर्णी
9850035037
[25/11, 2:39 pm] Charudatta: *सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज*

*बीजेपी चे बहुमत सिद्ध*

*बीजेपी* :        105
*राष्टवादी* :       04
*अपक्ष* :          14
----------------------
*एकूण* :          123
*18%GST* :    22
----------------------
*Grand Total* : *145*
बहुमत सिद्ध 
✌✌✌✌✌✌✌✌
[25/11, 3:21 pm] Vdp subodh: काही आमदारांना कोल्हापूरच्या 'तावडे हॉटेल'वर ठेवणार 
-सूत्र 😅

ब्रेकींग न्यूज- सूत्र आणि तावडे हॉटेल दोन्हीपण कुणी बघितले नाहीत😂
[25/11, 3:21 pm] Vdp subodh: कुणीच विचारत नाही म्हणून ....

मनसेचा एक आमदार स्वतः होऊनच हॉटेलमध्ये जाऊन राहिल्याचे सूत्रांकडून समजत आहे ! 😂😂

[25/11, 3:25 pm] Charudatta: फोडले का ?
बायकोने किचन मधून विचारलं ...

अजून एकही फुटला नाही !
टीव्ही न्यूज बघतच मी उत्तरलो ...

जळलं मेलं लक्षण, एक काम धड जमत नाही तुम्हाला,
तुम्ही सोडा, मीच फोडते !

बायकोचे उद्वेगाचे स्वर ऐकून मी भानावर आलो ...
ती नारळांबद्दल विचारत होती
अन मी आमदारांबद्दल सांगत होतो..
तीन दिवसात डोक्याचा भूगा झाला राव!

🤣🤣🤣🤣🤣🤣

Friday, November 8, 2019

पु ल नचे चित्रपटीय विनोद

" पु. लं. चा 'चित्रपटीय' विनोद " -- धनंजय-कुरणे-कोल्हापूर 
(9325290079)
(दि. 8 नोव्हेंबर 2018)
--------------------------------------------------------- 

1948 ते 1954 अशी, उणीपुरी सहा-सात वर्षांची,
पु. लं.ची 'रुपेरी पडद्यावरची' कारकीर्द ! पण या छोट्या  कालावधीतसुद्धा, 'प्रसन्न व  निर्विष विनोद आणि हजरजबाबीपणा' यामुळं, त्या वेळच्या चित्रसंसारात पु. लं. नी एक आगळंच चैतन्य निर्माण केलं होतं. 

चित्रपट सृष्टीतले ते 'मंतरलेले दिवस' होते आणि पु. लं. हे त्या दिवसातले एक प्रभावी 'मांत्रिक' होते. 

'दत्ता धर्माधिकारी' नावाचे एक चित्रपट दिग्दर्शक होते. त्यांच्या प्रत्येक चित्रपटात किमान एक तरी "स्मशानदृश्य" असायचं . एका रात्री पु.लं., वसंत सबनीस आणि इतर काही मित्र अलका टॉकीजला 'नवाचा खेळ' बघायला गेले होते आणि सिनेमा संपल्यावर रात्री बारा-साडेबारा वाजता 'लकडी पुलावरुन' परत येत होते. तेव्हा समोर 'वैकुंठ'मधे एक 'चिता' जळताना दिसली. भोवती भरपूर गर्दी होती. वसंत सबनीस म्हणाले, 'कुणीतरी बडी असामी गेलेली दिसतेय!' पु.लं. चटकन म्हणाले, ' छे रे, दत्ता धर्माधिकारीच्या पुढच्या सिनेमाचं शूटिंग चालू असेल'. या विनोदानं त्या गंभीर वातावरणातही सगळे मित्र जोरजोरात हसू लागले. 

काही निर्मात्यांनी आर्थिक व्यवहारात फसवल्यामुळे पु.लं.नी चित्रपटसृष्टी सोडली असं म्हणतात. पण पु.लं.नी याची जाहिर वाच्यता कधीच केली नाही. 
तरी 'निर्मात्यांविषयीचं' त्यांचं मत कधीतरी विनोदातून प्रकट होत असे. 'एकमेकांशी अजिबात सख्य नसलेले' दोन निर्माते एका समारंभात परस्परांना आलिंगन देत आहेत असं दृश्य पु.लं.नी पाहिलं. तेव्हा, शेजारच्या व्यक्तीला ते म्हणाले, 'बघ, आत्ता एकाचं पाकिट चोरीला गेलं असणार आणि एकाचं पेन! शिवाय, मुळात ते पाकिट आणि पेन ज्यांचं आहे ते बिचारे आपलं पाकिट आणि पेन शोधत असणारच!' 

'सब कुछ पु.लं.' अशी जाहिरात झालेल्या 'गुळाचा गणपती'ला सुरूवातीला फारशी गर्दी होत नव्हती. तेव्हा पुलं विनोदानं म्हणाले की, 'सब कुछ पुलं' या जाहिरातीमुळं लोकांचा असा समज झाला असावा की इथे 'प्रेक्षकांच्या' भूमिकेत सुद्धा फक्त पुलंच आहेत; म्हणून लोक चित्रपट बघायला येत नसावेत !
(नाहीतरी त्या काळी, काही अपवाद वगळता मराठी चित्रपटांना प्रेक्षकवर्ग मिळणं दुरापास्तच होतं. माझे एक ज्येष्ठ मित्र सांगतात की त्यांच्या लहानपणी गावात मराठी सिनेमा लागला की 'दुपारी तीनच्या' खेळाला पन्नास साठ प्रेक्षक असायचे, 'सहाच्या' खेळाला ही संख्या पंचवीस तीस पर्यंत कमी व्हायची आणि रात्री 'नऊच्या शो'ला तर डोअरकीपर, 'वर बाल्कनीत एकट्यानं भिती वाटते' म्हणून खालीच येऊन उभा रहायचा!)

'दूधभात' चित्रपटाचं शूटिंग चालू असताना, हिंदीतले एक प्रसिद्ध निर्माते सेटवर आले होते. तिथलं साधं वातावरण आणि कामाचा वेग पाहून त्यांनी विचारलं, 'तुमचा मराठी चित्रपट तयार व्हायला बजेट किती लागतं? आणि वेळ किती लागतो ?' तेव्हा पुलं त्वरीत उत्तरले, 'तुमच्या हिंदी चित्रपटाच्या संपूर्ण शूटिंग मधे 'लंच'वर जेवढा खर्च होतो तेवढ्या बजेटमधे आमचा मराठी सिनेमा तयार होतो आणि 'लंच'वर तुमचा जेवढा एकूण वेळ जातो, तेवढ्या वेळात आमचं सगळं शूटिंग पूर्ण होतं'. यावर ते निर्मातेसुद्धा खळखळून हसू लागले. 

"चित्रपटसृष्टीतली सहा वर्षांची सफर ही माझ्या आयुष्यातील सर्वात आनंददायी सफर होती" असं पुलं नी म्हटलेलं आहे. खरं म्हणजे पुलं ची ही चित्रयात्रा, त्या काळी सिनेजगतात वावरणा-या अनेकांसाठी आनंदाची पर्वणीच ठरली होती. पुण्यातल्या तिन्ही स्टुडिओतल्या कलाकारांना पुलं हवेहवेसे वाटत व पुलं च्या येण्याची, ते उत्सुकतेनं वाट बघत. 
पुलं नी 'रुपेरी दुनियेचा' निरोप घेतल्यानं मराठी सिनेमाची हानी तर झालीच पण सारे  सहकलाकार, पुलंच्या 'रुपेरी विनोदाच्या सत्संगाला' कायमचे मुकले ! 

--------------------------------------------------------- 

अभिप्राय -- 

खुप-छान-माहिती !
पु-लं-नी मराठी चित्रपट व्यवसायाला भरभरून दिलं.
पण दुर्दैवानं ह्या व्यवसायातल्या लोकांनी त्यांना फसवलं.
म्हणूनच ते ह्या व्यवसायापासून  दूर गेले. जर आर्थिक यश मिळालं असतं तर आपल्याला एकसे-एक दर्जेदार विनोदी सिनेमे पहायला मिळाले असते.

-- श्रीनिवास-लखपती-पनवेल

Sunday, October 27, 2019

हृदयनाथ मंगेशकर

मंडळी *सप्रे*म नमस्कार ! आज २६ आॅक्टोबर २०१९! आज मी तुम्हाला एका अशा कलाकाराबद्धल माहिती सांगणार आहे की जो पहिल्यांदा चालायला लागला तेंव्हा ८ वर्षाचा होता.पायाला हाडाचा क्षयरोग झालेला , पायाच्या असह्य वेदनेमुळे जो कळवळायचा , लपालपीच्या खेळात सहज पकडला जायचा कारण डाव्या पायामागची रक्ताची धार सांगायची तो कुठे लपलाय ते ! याच्या गळणार्‍या रक्त पुवामुळे मोठ्या ४ बहिणी कुठे बाहेर खेळायलाच जात नसंत... वडील गेले ( २४ एप्रील १९४२ )  ४१ वर्षे ३ महिने २३ दिवस त्यांचं वय होतं व याचं वय होतं साडे चार वर्षे ! कोल्हापूरच्या मुक्कामात एका शेतकर्‍याने दिलेली मुळी उगगाळून लावली व आठ दिवसांत पाय बरा झाला व आठव्या वर्षी हा चालायला लागला पण डावा पाय आखूड राहिला.असा हा कृश चालीचा मुलगा ९ व्या वर्षी *छान चालीत गाऊ लागला तो अजून गातोय आजपर्यंत !* चाल नीट नसलेला हा भलत्याच चांगल्या चालीचा निघाला ! ९ व्या वर्षी फिटस् चा आजार झाल्यावर पुढे औषधपाण्याने नव्हे तर शंकरापुढील अखंड ज्योतींनी हा १३ वर्षांनी म्हणजे २२ व्या वर्षी चं फिटस् चं भयंकर दुखणं गेलं!


मंडळी हा मुलगा म्हणजे २६ आॅक्टोबर १९३७ रोजी सांगलीला मूळ हर्डिकर आडनांवाच्या पण मंगेशीला स्थायिक झाल्याने आंडनांव मंगेशकर पडलेल्या मास्टर दीनानाथ व शेवंती यांना लता , मीना , आशा व उषा या ४ बहिणींनंतर झालेला *ह्रृृदयनाथ ऊर्फ बाळ !*


बाळच्या आठवणीतील मास्टर दीनानाथांच्या अनेक आठवणींपैकी एक इथे नमूद करतो.....

लता,मीना,आशा,उषा खाली खेळायला गेल्या होत्या.आई स्वयंपाकघरात काहितरी करीत होती.मला शौचाला लागली. सरपटत मी खालच्या संडासात जाऊ शकत नव्हतो. मी रडारड सुरू केली. आई बाहेर आली. माझी अडचण तिच्या लक्षात आली. ती थकली होती का कंटाळली होती देव जाणे , पण एक कागद घेऊन तिने माझ्या समोर ठेवला व म्हणाली, *हां बस इथेच !* मीही त्या कागदावरच देहधर्म करू लागलो. आणि अचानक बाप गच्चीवरून त्या खोलीत आला. नेहमीचे कनवाळू डोळे रागाने एकदम लाल झाले. एकदम ओरडला , *गाढवा, इथे घाण करतोस? लाज नाहि वाटत?* माझ्यावर आणखी तो ओरडणार तेवढ्यात मीही धारदार आवाजात म्हणालो, *संडासात जायला मला काही तुमच्या सारखे चालता येत नाही!* मला मारायला उगारलेला बापाचा हात लुळा पडला! रागाने लाल झालेले डोळे झरू लागले. काही न बोलता तो पाय खेचत दुसर्‍या खोलीत गेला. आईने मला स्वच्छ केले. खिडकीपाशी हा बसला होता — खिन्न होऊन, डोळ्यात पश्चात्ताप , दुःख , पाणी सारे सामावलेले होते! माझं अपंगत्व मीच बापाला बोलून दाखवलं होतं.जी गोष्ट सारे जण माझ्यापासून लपवत होते ते रहस्य मला कळले आहे , उमगले आहे हे ह्या माझ्या उद्गारांनी बापाला दाखवून दिले होते. व्यंगाचा अर्थ कळत नव्हता. कळत होते ते दुखणारे हाड! मी बापाला माझी फक्त अडचण सांगितली होती !मला काय माहीत मला अज्ञात असलेल्या कट्यारीने मी त्या काळजावर मी खोल घाव केला होता म्हणून !


मला त्याने मांडीवर उचलून घेतले व म्हणाला , *गाढवा चुरूचुरू बोलायला शिकला आहेस. गाणं येतं का?* 

मीही जोरात म्हणालो *मला गाता येतं!* 

*गाऊन दाखव !* — बाप कौतुकाने म्हणाला. मग मी गायलो , *बालम आयो बसो मेरे मन में* — हे सेहगलचं गाणं म्हणून दाखवलं.

 *अगं ए , इकडे ये!* बाप अत्यानंदाने ओरडला! *अगं , आतापर्यंत यांचं रडणंच ऐकत आलो.पण हा गातोही , लेकाचा सुरात आहे! लंगडा असला तरी गाणारा होणार हा !*


मला हृदयाजवळ ओढून बाप म्हणाला ,*मी तुमच्यासाठी काही ठेवलं नाही! पण तुला कळायचं नाही , थांब तुला मी एक बंदीश शिकवतो — चल गा!* आणि बाप गाणं शिकवू लागला *अलबेली तू घुंगट खोल* 


*आज या बंदिशीचा राग ताल माहित नाही पण बंदिश पूर्ण संपूर्ण सही सही याद आहे कारण त्या देशी बापाने मला गंडाबंद शागीर्द केले होते ना !*


मंडळी , *बैजू बावरा* मधे नौशादसाहेबांनी मास्टर रतन या बाल कलाकाराच्या तोंडी असलेलं एक भजन बाळकडून गाऊन घेतलं होतं ! हे बाळचं चित्रपटातील पहिलं गाणं — वय वर्ष १५ ! साधारण याच सुमाराला बाळच्या वयाच्या मुलांनी *सुरेल बाल कला केंद्र* या नावाने एक वाद्यवृंद तयार केला.यात मीना उषा आणि हृदयनाथ यांचा सहभाग होता पडला काळात संगीतकार झालेला लक्ष्मीकांत मेंडोलिन प्यारेलाल व्हायोलिन वाजत असे लक्ष्मीकांतचा भाऊ शशिकांत तबला वाजवत असे लक्ष्मीकांत आणि पॅरेलल या दोघांची ओळख याच वाद्यवृंदात झाली बाळाचा गाण्यावरचा गाण्याचा कल बघून लताने त्याला शास्त्रशास्त्रीय संगीताचे गायक उस्ताद अमीर खाँ यांच्याकडे शिकायला पाठवलं एकोणीसशे छप्पन्न सत्ता सालच्या सुमाराला बाळने पहिला चाली बनवल्या आणि त्या होत्या तिन्ही सांजा सखे मिळाल्या कशी काळ नागिणी आणि चांदणे शिंपीत जाशी 


*बाळ बद्दल बोलताना लता सांगते :*


त्याला आधी आकर्षित करते ती कविता! सोप्या सोप्या कवितांऐवजी गोविंदाग्रज ,आरती प्रभू , भा.रा. तांबे , बालकवी या मराठी साहित्यातील श्रेष्ठ कवींच्या रचनांना बाळनं चाली दिल्या. *घन  तमी शुक्र बघ राज्य करी* या सारख्या अवघड कविता त्यांना रेकॉर्ड केल्या कवी ग्रेस साठी !बाळने आजतागायत माझ्यापुढे स्वतःसाठी कधीही पैसे मागितले नाहीत! त्यांचं संगीत ,त्यांचे कार्यक्रम यातून मिळणाऱ्या पैशातून तो स्वत:चा खर्च भागवतो.  माझ्या शिफारसीवर बाळला सहज काम मिळाले असते. पण ते त्याला खपत नाही , तो म्हणतो *दीदी तुझा भाऊ म्हणून सिनेमा मिळणार असेल तर मला ते नको ! माझ्या गुणांमुळे काम मिळालं  तर मी ते स्वीकारेन!* 


भालजी पेंढारकर यांच्या बरोबर आमचे घरोब्याचे संबंध होते .म्हणून मी एकदाच बाळसाठी शब्द टाकला. भालजींचा *आकाशगंगा* बाळनं संगीत दिलेला पहिला चित्रपट ! त्यानंतर बाळने *निर्मल चित्र* ही संस्था सुरू करून दोन तीन चित्रपटांची निर्मिती केली. एखादं काम हाती घेतलं म्हणजे त्या विषयात पूर्णतः बुडून जाण्याचा बाळाचा स्वभाव आहे. त्या काळात तो अस्वस्थ असतो. माझ्यासोबत केलेला कोणताही अल्बम असूदे , त्याचं ते अभ्यासात बुडून गेलेलं रूप मी पाहिलं आहे.ज्ञानेश्वरांच्या रचना बाळनं दोन टप्प्यात स्वरबद्ध केल्या. पहिल्यांदा घनू वाजे घुणघुणा , पैल तोगे काऊ कोकताहे , पसायदान या रचनांची रेकॉर्ड निघाली. पुढे ज्ञानेश्वर माऊली ही लाँग प्ले रेकॉर्ड केली. दोन्ही वेळा ज्ञानेश्वरीचा बाळनं सखोल अभ्यास केला !


मिर्झा गालिबची रेकॉर्ड करताना गालिब समजून घेण्यासाठी बाळनं उर्दूचा अभ्यास केला. केवळ गालिब नव्हे तर मोमीन , मीर , दाग इत्यादी कवीदेखील अभ्यासले.


छत्रपती शिवाजी महाराज , सावरकर ही त्याची आराध्यदैवतं आहेत ! १९७४ मध्ये शिवराज्याभिषेकाला तीनशे वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने आम्ही *शिवकल्याण राजा* हे रेकॉर्ड बनवली. बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यासाठी खास निवेदन केलंय. त्याची तयारी दीड दोन वर्षे सुरू होती. त्या वेळेलाही बाळने मराठ्यांचा इतिहास अभ्यासला. 


मीराबाईच्या रचनांच्या दोन रेकॉर्ड देखील बाळनं अशा झपाटल्यागत केल्या! विशेषत:  *चाला वाहि देस* या रेकॉर्डचा इथे उल्लेख करावा लागेल. मीरासाठी त्यांना राजस्थानी संस्कृतीचाही अभ्यास केला! 


१९७४लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये ११  , १२  आणि १४ मार्चला मी पहिल्यांदा संगीत रजनी केली. त्याचं संपूर्ण नियोजन आणि देखरेख बाळची होती. दहा बारा वर्षांपूर्वी आम्ही पुण्यात दीनानाथ रूग्णालय  उभारलं. लता मंगेशकर नावाच्या वलयामुळे या रुग्णालयाला फक्त लताची प्रेरणा आहे असाच लोकांचा समज ! खरी गोष्ट अशी आहे की हे रुग्णालय उभं करण्याची कल्पना प्रथम बाळ आणि उषा यांच्या डोक्यात आली. त्या दोघांनी त्यांच्या गाण्यांच्या कार्यक्रमातून मिळालेल्या अल्पशा उत्पन्नातून पहिली ओंजळ टाकली आणि प्रत्यक्ष रुग्णालयाच्या भूमिपूजनाच्या वेळी मला ही कल्पना सांगितली. पुढे मग आम्ही बाबांच्या जन्मशताब्दी  निमित्ताने पुण्यात व अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात संगीत रजनी सादर करून निधी उभारला. या एकूणच प्रकल्पात बाळनं अपार मेहनत घेतली !


*माई मंगेशकर म्हणजेच बाळची आई यांच्या दृष्टीकोनातून बाळ :*


*बाळ सिंहासारखा आहे! शूद्र गोष्टींचा विचार त्याच्या मनात कधीतरी येणे शक्य आहे का ?त्याची झेप फार मोठी आहे.* तंबोरा लावून तो असाच चीज़ा आळवीत बसला होता तेंव्हा माझ्या मनात हा विचार आला! मध्यंतरी टीव्हीवर बाळची मुलाखत झाली *शब्दांच्या पलीकडे* मध्ये मुलाखत घेणार्‍याला बाळ सांगत होता की *त्याची कुठली कुठली गाणी त्यांना त्यांच्या वडिलांच्या चीज़ांवरून घेतली म्हणून! त्या ऐकताना मी विचार करीत होते की, वयाच्या पाचव्या वर्षी वडील गेल्याचे धड ते गेलेलेही आठवत नसेल याला तर त्यांच्या चीजा कुठून आठवतात ? त्यांच्या वडिलांची त्याच्यावर संपूर्ण छाया पडलेली आहे! त्यांच्या या चिजा त्याच्या मुखातून कशा येतात हे कुणाला कळायचं नाही! त्यांच्या या चीज़ा तो म्हणतो हे कसं होतं हे फक्त आम्हाला समजतं , लोकांना नाही समजायचं ते!*


बाळ मीरेची गाणी करत असताना आणखी एक चमत्कार झाला. लता खूप आजारी होती. तिच्या पोटात ट्युमर झाला होता. तिच्या पोटात इतकं दुखायचं की तिला धड चालताही येत नसे. मला कुणी काही सांगितलं नाही. तिला तर वाटलं की आपण आता काही जगत नाही. पण ती म्हणायची, *बाळ मीरा करायची आहे!* रेकॉर्डिंगच्या वेळी बाळ, मीना, उषा सगळे रडताहेत. मी विचारलं, * का रे सगळे रडता ?* तर म्हणाले *चाल चांगली झाली आहे म्हणून!* मला खोटंच सांगितलं की लता कोल्हापूरला चालली आहे म्हणून. पण ती गेली हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करायला. पोटातला गोळा इतका मोठा होता की डॉक्टरही अचंबा करून राहिले ! पण अशा परिस्थितीत पण लता गायली! हा सगळा मीराचाच चमत्कार ! मी लताला म्हणाले *मीरानंच तुला वाचवलं!*

*बाळच्या वडिलांनी म्हणजेच मालकांनी पुण्याला घर घेतलं तेव्हा बाळ अवघा चार वर्षांचा होता. तर गृहशांतीला ब्राह्मण नाही बोलावले. बाळकडून संस्कृत मंत्र म्हणवून घेऊन घराची शांती केली —  इतकी बाळची स्मरणशक्ती तल्लख! मालकांना संस्कृत भाषेचं फार वेड होतं !सामवेद म्हणंत असायचे !*


*बाळच्या बाबतीत आशा भोसले म्हणते :*


"आम्ही सांगलीत आहोत. आमचं घर खूप मोठं आहे. सकाळी उठून मी गॅलरीत येते. रस्त्यावर बायका कमरेवर घागरी घेऊन येत आहेत. एवढं पाणी कशाला बरं ? माझ्या मठ्ठ डोक्यात प्रकाश पडेना ! धावत धावत जिन्याकडे जाते. जिना संपला की खाली एक मोठी फरशी आहे — त्यावर त्या बायका घागरीतील पाणी ओतंत आहेत. हे कशासाठी ?एक बाई दुसरीला सांगते, *देव पावला बघा त्यास्नी! चार पोरींच्यावर एक प्वारगं दिलं बगा !लै चांगली माणसं हाईत* बमी माईच्या खोलीकडे जाते तर तिच्या खोलीकडे मला जाऊ देईनात !अरे पण का? या पुढील काही आठवत नाही ....


साताऱ्यात आमचा मुक्काम आहे. घरासमोर अजिंक्यतारा दिसतोय. लता ,मीना ,मी ,उषा आणि बाजूची मुलं आली आहेत. मी बघते आहे : तो गोरा जाडा डोक्यावर खूप केस असलेला सुंदर पोरगा आहे. त्याला माईने पांढर्‍या चादरीवर बसवलेला आहे. आणि त्याच्या डोक्यावर टोपली भरून मुरमुरे बोरं मिसळून ओतते. मी धावते खाण्यासाठी. मुठी भर भरून घेते आणि खात सुटते! *हावरट मेली!* — इति माई. मला हे ऐकण्याची सवय झाली आहे — कारण मी खादाड आहे. मग कळलं की बाळ आज एक वर्षाचा झाला! म्हणजे मी चार वर्षांची झाली! त्या गोऱ्या जाड्या कडेवर घेऊन फिरण्यात खूप मजा आहे. आम्ही सर्व बहिणी त्याच्यावर खूप प्रेम करतो. बाबांचा तो जीव आहे. माई तर काय त्याची वेडी झाली आहे !


*बाळ , कधी कधी तू दीदीच्या प्रेमापोटी माझ्यावर अन्याय पण करतोस.पण तुला सर्व माफ आहे. कारण तू माझा छोटा भाऊ आहेस! पण तुला मी माझ्या मुलासारखं वागवलं आहे!* 


माझं दुःख जाणणारा बाळ ,आता तो मला गाणं शिकवत होता. ते गाणं :  *जिवलगा राहिले रे दूर घर माझे* १५ पंधरा ऑगस्ट १९६६ चं गाणं आहे. तो मला त्या छोट्या वयात सुद्धा कुठेतरी अंतराळात गेल्यासारखा वाटतो !त्यांचं वाचन फार दांडगं आहे. प्रत्येक शब्दाचा अर्थ घेऊनच तो चालीला सुरुवात करतो. *जिवलगा राहिले रे दूर घर माझे* हे गाणं तर एक नवा प्रयोग !हे सात मिनिटांचं गाणं —इंटरल्यूड म्युझिक नाही व आलाप हेच म्युझिक आहे. डबिंग नाही — लाइव्ह रेकॉर्डिंग ! एकदा सुरू केलं की थांबायचं नाही! फार अवघड पण मजा देणारं! आपली ताकद आजमावणारं गाणं !

*तरुण आहे रात्र अजुनी* या गीतात तर तो मंद्र सप्तकातला पंचम लावायचा व मग तारा सप्तकांतला पंचम लावायचा ! हे गाताना गाणार्‍याची परीक्षाच असते.पण त्यातंच मजा असते. त्याचं गाणं गायल्यावर मला एक वेगळंच समाधान मिळतं! पण ते समाधान माझी मुलं काही मला घेऊ देत नाहीत! 


आनंद व वर्षा मला म्हणतात,  *आई एक गोष्ट सांगू ?* *काय रे नंदू वर्षा ?*

वर्षा : *जसे बाळ मामा गातात ना तसं तुम्ही दोघी बहिणी म्हणजे तू आणि दिदी मावशी गात नाही!* 

आनंद म्हणाला , *बाळ मामा तानेला फेड आऊट फेड इन करतात ना आणि भावना पण जास्त असते त्यांच्या आवाजात !तुमचं गाणं छान असतं , पण त्यांच्या सारखं नसतं का?*

 *बोडकं! या प्रश्नाला काय उत्तर आहे ?त्याचं गाणं गाताना ना सर्व ताकद एकत्र करावी लागते तरी सुद्धा त्याच्यासारखं जमत नाही!*


*बाळ बद्दल बोलताना मीना खडीकर म्हणते :*


मी बाळकडे फार कमी गायली आहे. पण संगीतकार म्हणून मला  उभं करण्यात बाळने फार मदत केली! *माणसाला पंखा असतात* चं म्युझिक करतेवेळी तो संपूर्ण पाठीशी होता. त्याची *निस दिन बरसत्या नैन हमारे* ही चाल तर पंडित रविशंकरजींना खूप आवडली होती .पण तरी मला हे दु:ख आहे कि तो जो आहे तेवढा मान त्याला मिळाला नाही!


वयानं मी सहा वर्षांनी मोठी आहे पण म्युझिकमध्ये तो माझ्यापेक्षा सात वर्षांनी मोठा आहे !



*बाळ बद्दल बोलताना उषा मंगेशकर म्हणते :*

 बाळला शंकराचार्यांच्या हस्ते *भावगंधर्व* ही पदवी मिळाली हा आम्हा मंगेशकर कुटुंबियांच्या दृष्टीने आनंदाचा भाग आहे !कारण पूजनीय शंकराचार्य यांच्याकडून गौरवली गेलेली मंगेशकर परिवारातील ही तिसरी व्यक्ती — बाबा , दीदी आणि त्यानंतर बाळचा हा सन्मान झाला !

*सुरेल कला केंद्राच्या* माध्यमातून बाळने गाण्याचे कार्यक्रम सुरू केले आणि त्याच्या मुळे मी स्टेजवर गाऊ लागले. त्याला खेळाची पण खूप आवड आणि माहिती.तो लहानपणी उत्तम बॉलिंग करत असे. त्याला पेंटिंगची आवड पण होती.  तो खऱ्या अर्थाने पूर्ण कलावंत आहे!  एल.पी. रेकॉर्ड्सच्या चित्र डिझाईन्सच्या कल्पना पूर्ण त्याच्या असतात. बाळकडे गायला नेहमीच आवडतं — पण गाताना भीती पण वाटते. खूप रिहर्सल्स करून घेतो. अवघड चालीमुळे परफेक्शन होई तो तो सोडत नाही. त्यामुळे बाळकडे गायलेली गाणी गाजतात. मी तुलनेने बाळकडे कमी गायले .पण अशा *आकाशगंगा*  दीदी बरोबर *दसरा अन् दीपावली गाण्यात* खूप सुरुवातीला गायले.

*पवनाकाठचा धोंडी* मधलं  *काय बाई सांगू*  खूप लोकांना आवडलं!  बॅलेट रामायण कोरसमध्ये गायले. जानकीचं टायटल गायले. स्टेजवर ओम नमोजी आद्या प्रथम आमच्या वाद्यवृंदात कोरसमध्ये आरंभाला गायलं गेलं. सुरेल कला केंद्र ऑर्केस्ट्रात मी ,  मीनाताई , बाळ असायचो व लक्ष्मीकांतचा वाद्यवृंद ,शशिकांत , गणेश आनंद ,गोरख नायडू ,अरविंद मयेकर ,सुरेंद्र सिंह असत. नृत्यांगना म्हणून जीवनकला असे.

मंडळी , कालच्या या बाळला आज ८२ वर्ष पूर्ण झाली ! बाळासाहेब असच तुमचं संगीत ऐकत तुम्हाला शंभराव्या वर्षी पण शुभेच्छा द्यायचं भाग्य आम्हांस लाभो हि ईश्वरचरणी प्रार्थना !
कळावे,
आपला विनम्र ,
© उदय गंगाधर *सप्रे* म—ठाणे

Friday, October 18, 2019

एक प्यार का नगमा है। प्रिया प्रभुदेसाई

एक प्यार का नगमा है

स्रोत: विवेक मराठी    दिनांक20-Sep-2019  

 हे गाणे विखुरलेल्याबरेच काही गमावलेल्या कुटुंबाला एकत्र बांधणारा धागा आहेआनंदआपत्तीआशादुःखआजारपणअगदी मृत्यूच्या आघातातसुद्धा हे गाणे त्यांची सोबत करतेजीवनातील आनंदाचे गाणे हे असेच गाता आले पाहिजे

  

 

 शिवाजी पार्क येथील लेडी जमशेटजी रोडनेहमीचा रस्ता आहे माझादुतर्फा झाडे आहेत या रस्त्यावरकडक उन्हाळ्यात सावली मिळण्याएवढी उंच वाढली आहेततरीही मुंबई धुळीने एवढी माखलेली असते की कोणत्याही ऋतूत हिरवेगारप्रसन्न वगैरे वाटत नाहीआपण आपल्याच कामात एवढे गर्क असतो की  बोलता मायेची पाखर घालणार्या या झाडांकडे कधी लक्षसुद्धा जात नाही.

  

आज गेलेकारण या तीन मजली तरी उंचभरभक्कम झाडावर एक वेल चढली होतीत्याच्या आधारानेत्याला धरून आणि हे करताना तिने ते झाड पूर्ण व्यापून टाकले होतेआता त्याच्यावर सुंदर जांभळी फुलेही आली होतीत्या झाडाचे अस्तित्व या नाजुकशा वेलीने अधोरेखित केले खरेपण मजा अशी की त्याला त्याचे काही वैषम्य असावे असे वाटत नव्हतेतिलातिच्या नखर्यासकट अलगद पेलून उभा होता तोपरस्परांना इजा  करताएकमेकांच्या सोबतीनेआधाराने बहरलेले हे वृक्षवल्लीचे सहजीवन खर्या अर्थाने सार्थक ठरले होतेती त्याच्या जीवनरसावर वाढत होती आणि त्याच वेळी त्याचे सौंदर्य वाढवत होतीअत्यंत गोड नाते होते तेनाजूक आणि कणखर अशी ही दोन भिन्न व्यक्तिमत्त्वे मायेच्याविश्वासाच्या पाशात अडकली आहेत तोवर हे नाते टिकणारफुलणारबहरणारपण जर या झाडालाच कीड लागली तरतर मात्र ही वेलसुद्धा नष्ट होणार.

 

 

अनेकदा वेलीचा विळखासुद्धा एवढा घट्ट बसतो की वृक्षालाही काच सलतेत्याचीही घुसमट होतेएकमेकांच्या वाढीसाठी पूरक ठरणारे सिम्बायॉसिस गरजेचे आहे इथे.
 

हेच समीकरण पुरुष आणि स्त्री या नात्यातसुद्धा आहे.

एक प्यार का नगमा है

मौजों की रवानी है

जिंदगी और कुछ भी नहीं

तेरी मेरी कहानी है

 

 

भोग भोगूनजीवन समजलेली दोन माणसे जेव्हा एकत्र येताततेव्हा जे गीत गातील त्या गाण्यातील असोशी या गीतात आहेप्रेमाचा अतूट बंध बांधणे आपल्याच हातात असतेस्वप्नाच्या मनोर्याखाली एक विश्वासाचा पाया असतोतो असेलतर एका साध्या झोपडीतसुद्धा स्वर्ग निर्माण करता येतो.

 

 

जिंदगी और कुछ भी नहीतेरी मेरी कहानी है’ हा साक्षात्कार जेवढा लवकर होईलतेवढे आयुष्य सुखात जाते.

 

शोर या सिनेमाचा गाभा आहे पती आणि पत्नी यांच्यातील प्रेमतसेच वडील आणि मुलगा यांच्यातील बंधजीवनातील खडतर प्रसंगातसुद्धा एकमेकांचा हात घट्ट पकडून ठेवणार्या कुटुंबाचे हे गीत आहेएका अपघातात शंकरच्या (मनोज कुमारपत्नीचा (नंदामृत्यू होतोआपल्या मुलाला वाचवताना ती प्राण गमावतेपण त्या धक्क्यानेे मुलाची वाचा जाते.

 

ऑपरेशनच्या साहाय्याने मुलगा बोलू शकतोहे डॉक्टरांनी सांगितल्यावर प्रयत्नांची शर्थ करून शंकर पैसे जमवतोऑपरेशन यशस्वी होतेत्याच वेळी त्याच्या कारखान्यात एक अपघात होतो आणि त्यात शंकर मात्र आपली ऐकण्याची शक्ती गमावून बसतो.

 

हे गाणे विस्कटलेल्याबरेच काही गमावलेल्या कुटुंबाला एकत्र बांधणारा धागा आहेआनंदआपत्तीआशादुःखआजारपणअगदी मृत्यूच्या आघातातसुद्धा हे गाणे त्यांची सोबत करते.

 

कुछ पाकर खोना हैकुछ खोकर पाना है

जीवन का मतलब तोआना और जाना है

दो पल के जीवन सेइक उम्र चुरानी है

ज़िंदगी और कुछ भी नहीं,

तेरी मेरी कहानी है

 

जन्म आपल्या हातात नसतोमृत्यू तर नकोसा असूनही टाळता येत नाहीमग आपल्या हातात काय उरतेहातात असते ते या दोन क्षणांतील असंख्य क्षणत्यातूनच आपले जीवन घडवायचे असतेजगायचे असतेप्रत्येक क्षणाची किंमत जगूनच द्यायची असतेमग तो क्षण सर्वार्थाने का जगू नयेबरेच काही गमावले असलेतरी जे मिळाले आहे त्याची कृतार्थता आणि कृतज्ञता या गीतात आहे.

 

संसारात जेव्हा दोन माणसे एकत्र येताततेव्हा त्यांच्यातील अहंकाराचा संघर्षत्यांच्या स्वभावातील मूलभूत फरकपरिस्थितीला तोंड देण्याच्या भिन्न पद्धती ह्या सर्व गोष्टी असतातचपरंतु एकमेकांना समजून घेण्याची इच्छाएकमेकांबद्दल विश्वास हा या नात्याचा आधार असतोजगण्याच्या सगळ्या पातळ्यांवर अनुभव वाटून घेण्याची धडपड त्यांना एकत्र ठेवते.

 

तू धार है नदिया कीमैं तेरा किनारा हूँ

तू मेरा सहारा हैमैं तेरा सहारा हूँ

आँखों में समंदर हैआशाओं का पानी है

ज़िंदगी और कुछ भी नहीं,

तेरी मेरी कहानी है

 

ह्या गीताचे चित्रण म्हणजे स्वप्न आणि सत्य यांचा कोलाजगाण्यात भूतकाळाची आणि वर्तमानकाळाची दृश्ये एकमेकांत मिसळली आहेतहा चित्रपट सत्तरच्या दशकातलाहे पाहिले तर उपलब्ध असलेल्या टेक्नॉलॉजीचा अतिशय हुशारीने वापर करून हे गीत चित्रित केले आहेगाण्याच्या चित्रीकरणात नायिकेच्या दोन प्रतिमा एकमेकांच्यात मिसळून परत वेगवेगळ्या दिशेने गेलेल्या दाखवल्या आहेतसुख-दुःखाच्या क्षणांनीच आयुष्य समृद्ध होतेतसेही उन्हाने पोळल्याशिवाय सावलीचे महत्त्व समजत नाहीचमहत्त्वाचे असते ते एकमेकांच्या संगतीने कोणत्याही परिस्थितीचा सामना करणे.

 

तूफ़ान तो आना है कर चले जाना है

बादल है ये कुछ पल काछा कर ढल जाना है

परछाईयाँ रह जातीरह जाती निशानी हैं

जिंदगी और कुछ भी नहीं,

तेरी मेरी कहानी है

 

अडचणी येतातचपण मन साफ ठेवून हातातला हात घट्ट पकडला तर निघूनही जातातएकदा हे आयुष्य तुझे आणि माझे आहे असे उमगलेतर त्यांच्या खुणा जरी राहिल्या तरी त्या एकत्र राहायला मदत करतातआयुष्यातील आनंदाला क्षणभंगुरतेचा शाप असतोचम्हणून जगण्यासाठी महत्त्वाची असते ती कधीही  सुटणारी साथ.

 

 

एक प्यार का नगमा है हे गीत संतोष आनंद यांनी लिहिलेले असूनचित्रपटाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मुकेश आणि लता मंगेशकर यांनी ते गायलेले आहेतुमचे सर्वात आवडीचे गीत कोणते आहेया प्रश्नाला उत्तर देताना लक्ष्मीकांत यांनी सांगितले होतेपहिल्या तिन्ही क्रमांकांवर या गीताचा अधिकार आहेभावनांची तीव्रता सुरात आहेशब्दात आहेपण लक्ष देऊन ऐकाआनंद आणि उदासीनता या दोहोंचा प्रत्यय गीत ऐकताना येतोलक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या सांगीतिक कारकिर्दीत शोर हा चित्रपट मैलाचा दगड आहे.