रहें न रहें हम
महका करेंगे
बन के कली
बन के सबा
बाग-ए-वफा में
मौसम कोई हो, इस चमन में, रंग बन के रहेंगे हम खिरामा
चाहत की खुशबू, यूँ ही जुल्फों से उड़ेगी, खिजा हो या बहारें
यूँ ही झूमते और खिलते रहेंगे
बन के कली...
खोये हम ऐसे, क्या है मिलना, क्या बिछडना नहीं है याद हमको
कूचे में दिल के, जब से आये, सिर्फ दिल की ज़मीं है याद हमको
इसी सरजमीं पे हम तो रहेंगे
बन के कली...
जब हम ना होंगे, जब हमारी खाक पे तुम रुकोगे, चलते-चलते
अश्कों से भीगी, चांदनी में, इक सदा सी सुनोगे, चलते-चलते
वहीँ पे कहीं हम तुमसे मिलेंगे
बन के कली…
मी असेन वा नसेन
तुला तिथेच भेटेन
वसंतातली कळी होऊन सकाळची शीतळ झुळुक होऊन
प्रेमाच्या विश्वासाच्या बागेत
असो शिशिर असो ग्रीष्म
मी अशीच भेटेन तुला सदा सतेज
तुझ्या प्रेमाचा सुगंध उधळत
अशीच भेटेन तुला
तिथेच ….अस्फुट उमललेली डोलणारी कळी बनून
तुझ्या प्रेमात अशी काही बुडलेय
की मला काहीच आठवत नाहीये ….मिलन विरह
या प्रेमाच्या विश्वात पाऊल ठेवले
अन् मला तूच दिसतोयस सगळीकडे
तिथेच असेन मी
अशीच भेटेन तुला
अस्फुट उमललेली डोलणारी कळी बनून
कदाचित उद्या मी नसेन
चालताना कदाचित अडखळशील
माझ्या अस्तित्वाशी
माझ्या अश्रूंनी भिजलेल्या चांदण्यात
दूर कुठेशी माझी साद येईल तुला ऐकू
तिथेच कुठेशी असेन मी
अस्फुट उमललेली डोलणारी कळी बनून
असित सेन दिग्दर्शित ममता सिनेमातलं हे गाणं. मजरूह सुलतानपुरींनी शब्दबद्ध केलेले रोशनचे दैवी संगीत लाभलेले एक अजर-अमर गीत.
हिंदी सिनेमांमधे प्रेमाची किती रूपं , किती परी दाखवल्या गेल्यायत . काव्यबध्द झाली आहेत. खुद्द मजरूह सुलतानपुरींच्या लेखणीतूनही प्रेमाची अनेकानेक रूपं आली आहेत पण या गाण्याची जातकुळीच वेगळी.
एका असफल प्रेमाचे हे गीत आहे. प्रेम लौकिकार्थाने असफल असले तरी त्यातली असोशी जन्मजन्मांतरीची आहे. त्या प्रेमात एक प्रगल्भ , संयमित आब आहे. ते उथळ नाही. म्हणूनच त्यात एक ठहराव आहे. प्रेम यशस्वी नसले तरी insecurity ची भावना नाही.
ती त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली आहे. त्याच्या प्रेमाच्या सुगंधाने सदा बहरलेली आहे. तिला स्थळ काळ मिलन विरह कशा कशाचेच भान नाहिये. तिला जाणवतेय ती फक्त त्याच्याशी असलेली एकरूपता. जी तिच्या मृत्यूनंतरही संपणार नाही. मृत्यूनंतरही तिचे अस्तित्व त्याच्या भोवतीच घुटमळत राहील. तिच्या प्रेमाला मृत्यूची सीमा रोखू शकत नाही.
या अशा अशरीरी प्रेमगीताला तशीच साजेशी अशरीरी चाल रोशननी दिल्येय. त्या चालीने त्या प्रेमाची पातळी अलौकिकाकडे गेलेली आहे.
सुचित्रा सेनने ममतातील भुमिकांचे (double role ) सोनं केलंय. प्रेमातली संयतता अशोककुमारने त्याच्या नैसर्गिक अभिनयाने बखूबी दाखवली आहे.
प्रेम असफल असले तरी ते आक्रस्ताळं होऊ न देता समर्पणाच्या तृप्तीत ती दोघं असतात. समोर त्यांना त्याचं सुपर्णा आणि इंद्रनीलच्या रूपात दिसणारं उज्ज्वल भविष्य दिसत असतं. ते पहात ते कृतार्थ होतात.
#CinemaGully
No comments:
Post a Comment