#Cinemagully
मेरा कुछ सामान...
मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है
सावन के कुछ भीगे भीगे दिन रखे हैं
और मेरे एक खत में लिपटी रात पड़ी है
वो रात बुझा दो, मेरा वो सामान लौटा दो
माझं काही सामान, काही चीजवस्तू तुझ्याजवळच अजून पडून आहेत. तुझ्यासोबत घालविलेले ते श्रावणातले ओले दिवस तुझ्याजवळच मी एखादा ठेवा जपून ठेवावा तसे ठेवले आहेत. आणि मी तुला लिहिलेल्या पत्रात गुंडाळलेली एक रात्रदेखील तुझ्याकडेच अद्याप पडून आहे. आता एक कर, ती रात्र तू विझवून टाक. मागच्या कुठल्याच गोष्टी आता शिल्लक नकोत. मात्र सगळं काही विझविण्याआधी तुझ्याकडे शिल्लक असलेल्या माझ्या चीजवस्तू मला परत पाठव.
पतझड़ है कुछ ... है ना ?
पतझड़ में कुछ पत्तों के गिरने की आहट
कानों में एक बार पहन के लौट आई थी
पतझड़ की वो शाख अभी तक कांप रही है
वो शाख गिरा दो, मेरा वो सामान लौटा दो
थोडीशी पानगळती आहे. त्यावरून आठवलं, अशाच एका पानगळतीच्या काळात गळणाऱ्या पानांचा आवाज मी माझ्या कानात घातला होता नि तोही अशा रीतीने की, आपण अंगावर जणू एखादे सुंदर वस्त्रच घालत आहोत. ज्या फांदीवरून ही पानगळ झाली होती ती फांदी अजून माझा मनात थरथर कापतेय. ती कंप पावणारी आपल्या प्रेमाची फांदी तुझ्या मनातून कापून टाक नि माझ्या चीजवस्तू माझ्याकडे परत पाठव.
एक अकेली छतरी में जब आधे आधे भीग रहे थे
आधे सूखे आधे गीले, सुखा तो मैं ले आयी थी
गीला मन शायद बिस्तर के पास पड़ा हो !
वो भिजवा दो, मेरा वो सामान लौटा दो
कुठल्यातरी एका पावसाळ्यात एका दिवस आपण दोघेही एकाच छत्रीत अर्धओल्या अवस्थेत खूप भटकलो होतो. त्या आठवणींनी आतादेखील ओलं असलेलं माझं मन बहुधा तुझ्या अंथरुणाशेजारी पडलेलं असेल. तेही माझ्याकडे पाठव.
एक सौ सोला चांद कि रातें एक तुम्हारे कांधे का तिल
गीली मेंहदी कि खुशबू, झुठ-मूठ के शिकवे कुछ
झूठ-मूठ के वादे सब याद करा दो
सब भिजवा दो, मेरा वो सामान लौटा दो
तुझ्यासोबत घालविलेल्या क्षण नि क्षणाचा तपशील मला अद्याप आठवतोय. तुझ्यासोबत अगदी मोजून सांगायचे तर एकशे सोळा चांदराती मी किती आनंदात घालविल्या. तुझ्या खांद्यावर असलेला एका तीळ, माझ्या हाताच्या ओल्या मेंदीचा सुगंध, त्यातच आपण एकमेकांशी केलेल्या खोट्या तक्रारी नि आपण घेतलेल्या आणाभाका या सर्वांचा पुनर्रआठव एकदा तू मला करून दे नि सोबत माझ्या सर्व चीजवस्तू माझ्याकडे पाठव.
एक इजाज़त दे दो बस, जब इसको दफ़नाऊँगी
मैं भी वहीं सो जाऊंगी, मैं भी वहीं सो जाऊंगी
आणखी एक कर. हे सामान, ह्या चीजवस्तू तू मला पाठवशील तेव्हा ह्या वस्तूंना जमिनीत गाडून टाकताना मलादेखील गाडून घेण्याची परवानगी दे. त्या वस्तूंसोबत मीही कायमची झोप घेईन म्हणते.
चित्रपट : इज़ाज़त (1988)
गायक : आशा भोसले
संगीतकार : राहुल देव बर्मन
गीतकार : गुलजार
✍️हेमंत देशपांडे
------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment