स्वराज्ञी आशा....
(Prapurika Joshi)
आशा भोसले ह्यांची प्रतिभा संगीतकारा नी बरोबर ओळखली होती..त्यांच्या आवाजाची चंचलता, धमाल,आणि सहज हास्य मधून काही गाणी खूप गाजली .., तर जेवढ्या त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीत मध्ये गायले तेवढ्याच अल्लड पणे त्याने केबरे,रॉक,डिस्को मध्ये ही गाणी गायली..
आशा भोसले चे ,मधुबाला वर चित्रिकरण झालेले हावडा ब्रीज मधले गाणे म्हणजे कोहिनूर हिरा होते..'. आइये मेहेरबा ....".अवखळ मदमस्त मधुबाला नाचताना समोर उभी राहिली आणि आशा भोसले च्या आवाजाची जादू चा अनोखा संगम आहाहा..मस्त च,
राहुलदेव बर्मन आणि आशा भोसले ,एक कल्पक हरहुन्नरी संगीतकार...."शब्दांचे सुरात रूपांतर करणारा अवलिया.'.,आणि आशा भोसले चा थिरकायला लावणारा आवाज,.........
Romantic गाणी ह्या जोडी ने मस्त च दिली,अगदी तरंगायला लावणारी काही गाणी,जी फक्त आशा च्याच आवाजात ऐकावी अशी च..
"आ ओ हुजुर तुमको..". ह्या गाण्यामध्ये ज्या ओळी आहेत त्या फिल्म मध्ये बबिता वर चित्रीत झालेल्या, ..ज्यात नुसती मदकाता ची उधळण व्हावी अश्याच,आवाजात.. "हमराज..हमसफर बनो "...ह्यात अशा भोसले चा आवाज इतका सुंदर नशिला लागला आहे की हरवून जायला होते ऐकताना, ..
अजुन ही जुनी गाणी आपण म्हणतो ,पण ती कितीतरी जवळ ची वाटतात..
हेच एक अजुन आशा जी चे गाणे मुमताज ला थिरकाताना बघून आपल्यालाही डोलायला लावणारे" ये हे रेशमी झुल्फो का अंधेरा न घाबराईये...ह्या गाण्याचा मध्ये आशा जी इतक्या काही गोड हसल्या आहेत,की ती हास्याची उधळण हे गाणे म्हणताना हेवा वाटावा इतकी सुरेख आहे, नशा आणावी गाण्याची ती आशा च्या गाण्या ऐकण्याची एवढे काही गाणी सुंदर गायली आहे. ...
"उडे जब जब जुल्फे तेरी" ..फिल्म नयादोर मध्ये दिलीपकुमार वैजयंती माला वर चित्रीत हे गाणे आज ही लोभस ,..श्रवणीय च
."इशारो इशारो मे दील .."..काश्मीर की कली ..धुंद वातावरण,..शम्मिकापुर एका हाताने फेटा डोक्यावर गुंडाळत..हळूच झाड्याचा अवतीभवती,फिरताना.. लाजणारी ,गालावर खळी,आणि प्रेमात ओतप्रोत शर्मिला टागोर.. किती सुंदर गोड लाजवाब लाजते,,अगदी प्रत्येक नाजूक ऍक्शन वर फिदा व्हावे असे तरल भाव ,एवढेच सुंदर बोल"मोहॉबत जो करते हे वो ...मोहोबत जताते नहीं... धडकने अपने दिल की कभी किसी को सूनाते नही...
ओ. पी चे म्युझिक आणि आशाजी चा आवाज... ह्या काश्मीर की कली चे हे गाणे आज ही वेगळ्या विश्वात घेऊन जाते...
त्यांची किशोर कुमार बरोबर ची अल्लड गाणी कुठेतरी मजेदार वाटली,तर हेलन नी पिसारा लावलेल्या ड्रेस मधून येताना,नाचताना बघून थिरकायला लावणारा गाणी ही तेवढीच मधाळ ..
"पिया तू अब तो.....
"दम मारो दम...
"चुरा लिया हे तुमने..."
कितीतरी अवखळ,गाणी किती सुंदर,R D आणि आशा ची गाणी आज ही तेवढेच ओढ लावणारी...
ज्वेलथिफ फिल्म मधली नटखट तनुजा जरा डोळ्यासमोर आणावी,आणि..".रात अकेली हे.".. उफ काय आवाज ,सगळी धावपळ मस्त गाण्यातून ही अनुभवावी अशी...
"परदे मे रेहेने दो..."आशा पारेख चे प्रत्येक पडद्या बरोबर खेळणे, भावले तेवढेच रहस्य उत्पन्न करणारे हे गाणे उत्सुकता वाढवणारे असे ..
फिल्म मध्ये भावना व्यक्त करण्यासाठी गाण्यांची, ओळ,रिदम,ठेका असणारी अगदी चपखल ही आशा भोसले च्या शैलीतली त्यांचीच ....त्यांचा आवाज एवढया जादुमय सांगितला स्पर्श करणारा,तर कधी डूलायला लावणारा..तर कधी डांबरट,अवखळ,चंचल भासणारा...पण मनात भरणारी ही गाणी,हा प्रेमळ आवाज,
काही सिनेमा पडद्या वर बघून,फक्त गाण्यासाठी परत बघावे,इतके ह्या अवाजामध्ये ओढ असणारे....वक्त,चौदविका चांद, गुमराह, ह्या फिल्म जेवढ्या गाजल्या तेवढेच त्यातले अशा जी चे गाणेही भावले.
काही सुर मनाला स्पर्श करून जाणारे असतात,त्यात आशा जी चा आवाजाची स्वर् मयी गोडी असणारी गाणी अजरामर ..एक संगीत जगात मधले अद्वितीय अष्टपैलू व्यक्तिमत्त्व..किती गाणी,कितीतरी रेकॉर्डस, किती अवॉर्ड मिळवलेले,गाण्याचा कोणताही प्रकार असो अगदी भावगीत ते ऋतु हिरवा पर्यंत...
गुजराती ते बंगाली गाण्या पर्यंत..
केब्रे ते चंचल गीत असो...
अगदी गझल ही ,शास्त्रीय गीत..प्रत्येक सुरा ना नवे रूप रंग,आशा भोसले च्या आवाजातून ऐकायला मिळाले..
आज ही एवढया वर्षांनी त्यांना त्या उत्साहपूर्ण वातावरणात गाताना बघून अगदी आपण ही गायला लागतो..".एक मे ओर एक तू...
एक रम्य संध्याकाळ असावी आणि ह्या. भावतरंग मध्ये गुंफून फक्त आशा जी ची सुर ऐकावे..रदया च्या तारा मस्त गाऊ लागतील बघा..आईये मेहेरबा.....
Prapurika..!!
No comments:
Post a Comment