Thursday, November 22, 2018

अरुंणि किरणी ...चारुदत्त

कट्यार काळजात घुसली

गीतकार समीर सावंत

 

धीम तनन धीम तन उदतन धेरेना … धीम तनन धीम तन उदतन धेरेना …(2)

आ…

अरुणी किरणी धरणी गगन चमके

भ्रमीत भ्रमर करी गुंजन हलके

अधीर मन मम जणू सरीत जल करीत स्वर झरझर…

धीम तनन धीम तन उदतन धेरेना …(2)

हो… बरसत बरसत

बरसे बरसे दिव्यभान स्वर्ग देस बरसे

तरसत तरसत तरसे तरसे मन तृषार्थ तव कृपेस तरसे

मम अंतरात मन मंदिरात स्वर ताल साज आज घुमतो

मन धुंद आज तव गुंजनात गुरुराज आज तुजसि दास स्मरतो

फिरते. धरती. धूम तननन

अवती .भवती… धूम्त

तन मन गगनी.अवनी.भरुनी कणकण स्वप्न एक आज आत रुजू दे…

आ…

जग हे भिजले जल सरीत अजि जरी

मन हे उरले का तृषार्थ मम परी

पडूदे क्षणीक तव कटाक्ष मजवरी

स्वर कट्यार काळजात घुसुदे…

धीम तनन धीम तन उदतन धेरेना …

धीम तनन धीम तन उदतन धेरेना …

अंधःकार गुरुविण जग भासे

कंठी स्वर उरलेत जरासे

किरण बनूनी क्षितिजी प्रकटावे

वरुण बनूनी हृदयी बरसावे

गुरुवर चरणी शरण मज द्यावे

वा तव स्मरणी मरण मज यावे…

धीम तननन…

आ…

पुन्हा जन्मण्यासाठी

द्यावा सुर सुधारस हो…

सुर… निरागस हो…(4)

 

भाषांतर/ गद्य रुपांतर : चारुदत्त कुलकर्णी

 

 

सूर्याच्या किरणांनी धरती आणि आकाश चमकतेय

भ्रमात असलेले  भुंगे  हलकेच गुणगुण करतायत

अधीर झालेल्या  माझ्या  मनातून  , पावसाच्या सरीप्रमाणे झरझर सूर बरसत आहेत

 

सूर असे बरसत आहेत , असे वाटते कि  स्वर्ग पृथ्वीवर अवतरला आहे

व्याकूळ मन तुझ्या कृपेसाठी तरसते आहे

माझ्या मनात आणि हृदयात आज स्वर ताल घुमतो आहे

धुंद मनाच्या गुंजनात हे गुरु तुला दास स्मरतो आहे

जमीन आकाशाभोवती फिरत आहे

जमीन आकाश शरीर मनात एक स्वप्न पूर्ण होऊ दे

 

आज जरी जड पावसाच्या धरत भिजले असले

माझ्या मनाची तहान का  भागत  नाही?

तुझा एक कटाक्ष क्षणभर माझ्यावर पडू दे

नंतर स्वर कट्यार काळजात घुसू दे

 

गुरुशिवाय जगात अंधार आहे

कंठात थोडेसेच स्वर उरतात

किरण बनून क्षितिजावर प्रकट व्हावे

ढग बनून हृदयात बरसावे

गुरुदेव तुमच्या चरणाशी मला घ्या

तुमची आठवण असतान मला मरण यावे

परत जन्मण्यासाठी सुमधुर सूर मिळावेत

सूर अखंड राहुदेत

 

No comments:

Post a Comment