Monday, August 3, 2020

डक वर्थ लुईस**इतिहासाची सोनेरी पाने*

*डक वर्थ लुईस*

*इतिहासाची सोनेरी पाने*

एका कारागिराने फ्रान्सचा राजा लुईस याला वीस किलो सोन्याचे बदक बनवून दिले. त्याच्या डोळ्याच्या जागी अत्यंत मौल्यवान माणके जडवलेली होती. त्या बदकाची किर्ती सर्वत्र पसरली.
तत्कालीन इंग्लंडच्या राणीला ते बदक आपल्याकडे असावे असे वाटू लागले. योगायोगाने तसे घडण्याची शक्यता निर्माण झाली.
एका युध्दात स्पेनने फ्रान्सचा पराभव केला आणि लुईस राजाला बंदी बनवले. ज्या जहाजातून  लुईसला नेले जात होते त्यावर ब्रिटिश आरमाराने हल्ला केला आणि जिंकल्यामुळे लुईस त्यांच्या ताब्यात आला. 
राणीला ही बातमी कळताच तिने लुईसला लंडनमधे आणवले आणि त्याला फ्रान्सला परत पाठवण्याचा ऑफर दिली.
परत फ्रान्सला जाण्याच्या आनंदात लुईसने त्या बदल्यात राणीला काय हवे ते देण्याचे बोलून दाखवले. राणीने तत्काळ ते सोन्याचे बदक हवे असल्याचे सांगितले.
हे जरा जास्त होतंय असे वाटले तरी लुईसने आपला शब्द पाळला आणि आपल्या प्रधानाला ते बदक इंग्लंडला पाठवण्यास सांगितले.
इथे बदक इंग्लंडला पोचले त्या दिवशी लुईसची सन्मानाने फ्रान्सला रवानगी झाली.
त्या बदकाएवढी लुईसची किंमत ठरल्याने ते बदक 'डक वर्थ लुईस' नावाने ओळखले जाऊ लागले.
राणीच्या ताब्यात जरी ते किंमती बदक आले तरी तिला ते ओबडधोबड वाटले. तिच्या संग्रहातील अन्य उच्च दर्जाच्या शोभेच्या वस्तूत ते 'कुरुप वेडे' दिसत होते. तसेच आपण ते मागण्यात मनाचा हीनपणा दाखवला अशी रुखरुख तिला लागली होती. तेव्हा काहीतरी बहाण्याने ते बदक परत करावे असे तिने ठरवले.
त्या काळात फ्रान्स आणि इंग्लंडमधे संबंध बरे असल्याने खेळांचे सामने भरत. त्या खेळांपैकी एका खेळात फ्रान्स हमखास विजयी होई तेव्हा त्या खेळात विजयी ठरणार्या  संघाला ते बदक भेट देण्यात येईल असे तिने जाहीर केले.
लुईसला बदक परत मिळण्याची  संधी निर्माण झाल्याने आनंद झाला. सामना सुरु झाला.पण दोन मिनिटात जोरदार पावसाला सुरुवात झाली. संध्याकाळपर्यंत खेळ होऊ शकला नाही. राणीने सामन्याच्या पंचाना जवळ बोलावून काहीतरी गुफ्तगू केले. आणि पंचांनी काहीतरी गडबडगुंडा निकष लावून फ्रान्सच्या संघाला विजयी घोषित करुन राणीच्या हस्ते ते सुवर्णबदक फ्रान्सच्या संघाच्या हवाली केले.
तेव्हापासून खेळ पावसामुळे पुरा होऊ शकला नाही तर काहीतरी थातुरमातुर  निकष लावून विजयी कोण ते घोषित केले जाऊ लागले व त्या सामन्याचा निकाल *डक वर्थ लुईस* पद्धतीने लागला असे जाहीर करण्याची प्रथा पडली. 

(प्रसिद्ध इतिहासकार *मॅग्देमाला* यांच्या पुस्तकातून साभार)

No comments:

Post a Comment